दीपक वसंत केसरकर [१] हे १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. [२] [३] ते शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करतात . [४] डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [१] ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. [५]
या आधी ते सावंतवाडी मतदारसंघातून बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर तेराव्या विधानसभेवर शिवसेनेकडून निवडून गेले होते.