दुसरा तिम्मराज वोडेयार

दुसरा तिम्मराज वोडेयार
मैसुरुचा सहावा राजा
अधिकारकाळ ७ फेब्रुवारी, १५५३ - १५७२
अधिकारारोहण ७ फेब्रुवारी, १५५३
राज्याभिषेक ७ फेब्रुवारी, १५५३
राजधानी मैसुरु

]

मृत्यू १५७२
मैसुरु
पूर्वाधिकारी तिसरा चामराज वोडेयार
' चौथा चामराज वोडेयार
उत्तराधिकारी चौथा चामराज वोडेयार
वडील तिसरा चामराज वोडेयार
संतती नाही
राजघराणे वडियार घराणे

दुसरा तिम्मराजा वोडेयार (? – १५७२) हा मैसुरु राज्याचा सहावा राजा होता. हा चामराजा वोडेयार तिसऱ्याचा मुलगा असून ७ फेब्रुवारी, १५५३ पासून मृत्यूपर्यंत सिंहासनावर होता. तिम्मराजा विजयनगरच्या आधिपत्याखाली नसलेला मैसुरुचा पहिला राजा होता.

विजयनगर पासून स्वातंत्र्य

[संपादन]

मैसुरु राज्याच्या स्थापनेपासून ते विजयनगर साम्राज्याचे सामंत राज्य होते. तिम्मराजा सत्तेवर येण्याआधी विजयनगरमध्ये सत्तेसाठी अनेक लोकांमध्ये ओढाताण सुरू होता व त्यात अनेक सम्राटांचा बळी गेला होता. अशा परिस्थितीत तिसऱ्या चामराजने विजयनगरपासून स्वतंत्र होण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या परंतु प्रत्यक्षात काही करण्याआधी त्याचा मृत्यू झाला. १५५३मध्ये तिम्मराजाचा राज्याभिषेक झाल्यावर लगेचच त्याने मैसुरु सार्वभौम राष्ट्र असल्याचे जाहीर केले. विजयनगरवर बहमनी सुलतान आणि मुघल साम्राज्याने उत्तरेकडून सतत हल्ले चालिवल्यामुळे सम्राट रामरायाला याबद्दल फारसे काही करता आले नाही. तिम्मराजाने सुरू केलेली हे सार्वभौमत्वाची हालचाल त्याचा भाऊ चौथ्या चामराजाने पूर्ण केली.