देवेन भोजानी | |
---|---|
![]() देवेन भोजानी | |
जन्म |
२५ नोव्हेंबर, १९६९ गुजरात |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, दिग्दर्शक |
कारकीर्दीचा काळ | १९८७- चालू |
भाषा |
|
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम | साराभाई वर्सेस साराभाई, खिचडी, भाकरवडी |
देवेन भोजानी हे एक भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. तसेच ते नाट्यकलाकार देखील आहेत जे त्यांच्या गुजराती नाटकांसाठी प्रसिद्ध आहेत. १९८७ मध्ये मालगुडी डेज या प्रसिद्ध कार्यक्रमातून त्यांनी दूरचित्रवाणीवर पदार्पण केले. त्यांनी मुख्यतः त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी आणि काही सहाय्यक पात्रांसाठी लोकप्रियता मिळवली. साराभाई वर्सेस साराभाईच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी तीन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जिंकले आहेत: द आयटीए अवॉर्ड, द इंडियन टेली अवॉर्ड आणि द अप्सरा अवॉर्ड.[१]
[१] IMDb
[२] Bollywood Hungama