धर्मनगर

धर्मनगरचे नकाशावरील स्थान

धर्मनगर
ধর্মনগর
भारतामधील शहर

धर्मनगरमधील काली बारी मंदिर
धर्मनगर is located in त्रिपुरा
धर्मनगर
धर्मनगर
धर्मनगरचे त्रिपुरामधील स्थान

गुणक: 24°22′24″N 92°9′56″E / 24.37333°N 92.16556°E / 24.37333; 92.16556

देश भारत ध्वज भारत
राज्य त्रिपुरा
जिल्हा उत्तर त्रिपुरा
समुद्रसपाटीपासुन उंची ६९ फूट (२१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४५,८८७
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


धर्मनगर (बंगाली: ধর্মনগর) हे भारताच्या त्रिपुरा राज्यातील उत्तर त्रिपुरा जिल्ह्याचे मुख्यालय व त्रिपुरामधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. धर्मनगर शहर त्रिपुरा राज्याच्या उत्तर भागात बांग्लादेशच्या सीमेजवळ स्थित असून ते आगरताळापासून सुमारे १७० किमी अंतरावर आहे. २०११ साली धर्मनगरची लोकसंख्या सुमारे ४५ हजार होती. धर्मनगर रेल्वे स्थानक आगरताळा-लुमडिंग रेल्वेमार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग ८ धर्मनगरमधूनच धावतो.