धर्मसभा ही कोलकात्यामधील हिंदू संस्था होती. या संस्थेने राजा राममोहन रॉय, हेन्री डिरोझियो, इ. तत्कालीन समाजसुधारकांनी केलेल्या सामाजिक बदलांना विरोध केला. ही संस्था समाचार चंद्रिका नावाचे नियतकालिक प्रकाशित करीत असे.
या संस्थेची स्थापना १८२९ च्या सती प्रतिबंधक कायद्याला विरोध करण्यासाठी करण्यात आली होती. लॉर्ड बेंटिंकने अमलात आणलेल्या या कायद्याविरुद्ध धर्मसभेने प्रिव्ही काउन्सिलमध्ये याचिका दाखल केली.[१] ही याचिका फेटाळली जाउन सतीप्रथेला प्रतिबंध करण्यात आला.[२][३]
यानंतर १८५६ च्या हिंदू विधवा पुनर्विवाह कायद्यालाही या संस्थेने विरोध केला आणि त्याविरुद्ध सरकारकडे दरखास्त केली.[४][५] ही दरखास्त फेटाळली जाउन लॉर्ड कॅनिंगने हा कायदा अमलात आणला.[६][७]
जॉर्ज तिसऱ्याचे एतद्देशीय समाजकारणात ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन सरकारने न पाळल्याबद्दल हे विरोध होते असे या संस्थेचे म्हणणे होते.