धुनुचि नृत्य हा एक पारंपरिक धार्मिक नृत्य प्रकार आहे.भारत देशातील पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापूजा उत्सवाच्या काळात हे नृत्य विशेषत्वाने केले जाते.[१]
स्वतःमधील सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वतः दुर्गादेवीने हे नृत्य केले होते अशी श्रद्धा असल्याने बंगाली परंपरेत या नृत्याला महत्वाचे स्थान आहे.यामुळे आसुरी प्रवृती दूर जाता आणि मनाला उर्जा मिळते अशी धारणा प्रचलित आहे.[२]
या नृत्याला आध्यात्मिक अधिष्ठान आहे असे मानले जाते. शारदीय नवरात्र उत्सव काळात संध्याकाळी केल्या जात असलेल्या दुर्गेच्या आरतीच्या वेळी हा नाच केला जातो. देवीला धन्यवाद देणे आणि तिचा आशीर्वाद घेणे असे या नृत्यामध्ये अभिप्रेत असते. ढाक म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या ढोलाच्या तालावर हा नाच केला जातो. हातांच्या आणि पायांच्या लयबद्ध हालचाली करताना तोंडात किंवा हातात धूप घालून पेटविले गेलेले मातीचे धुपाटणे घेतलेले असते. ते हातात घेऊनच हे नृत्य केले जाते.[३]