ध्रुव बाळ

ध्रुव बाळ

ध्रुवतारा - इत्यादींची अधिपती देवता

मराठी ध्रुव
संस्कृत ध्रुव:
निवासस्थान ध्रुवलोक,आकाश मंडल
लोक ध्रुवलोक
वडील उत्तानपाद
आई सुनीति
अन्य नावे/ नामांतरे ध्रुवतारा
मंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
नामोल्लेख भागवतपुराण, विष्णू पुराण
तीर्थक्षेत्रे मधुवन ,मथुरा उत्तरप्रदेश

विष्णू पुराण आणि भागवत पुराणातंतील कथेनुसार ध्रुव हा उत्तानपाद राजा व सुनीती यांचा मुलगा होता. पाच वर्षाचा ध्रुव हा वडिलांच्या मांडीवर बसला असताना त्याला त्याच्या सावत्र आईने-सुरूचीने ढकलले. त्यामुळे जेथून आपल्याला कोणीही ढकलणार नाही, अशा जागेच्या शोधार्थ ध्रुवाने राजवाडा सोडून मधुवन नावाच्या अरण्याची वाट धरली. तेथून तो परत आला नाही.[]

काही कालानंतर लोकांना आकाशात उत्तरेला एक न उगवणारा, न मावळणारा, न हालणारा तारा दिसला. लोकांना हा तारा म्हणजे ध्रुवच आहे असे वाटू लागले. तो एका तारकापुंजातला शेवटचा, म्हणजे सातवा तारा आहे. या तारकापुंजाला ध्रुवमत्स्य (इंग्रजीत लिटिल बेअर) हे नाव दिले गेले आहे. आकाशातील सप्तर्षी (इंग्रजीत ग्रेट बेअर) या पतंगासारख्या दिसणाऱ्या तारका-समूहातील पहिल्या दोन ताऱ्यांना सरळ रेघेने जोडून ती रेषा पुढे वाढवली की ती ध्रुवताऱ्यापर्यंत पोचते.

ध्रुव ताऱ्याला इंग्रजीत pole star [] म्हणतात

भूगोल

[संपादन]

पृथ्वी स्वतःभोवती फिताना ज्या काल्पनिक आसाभोवती फिरते त्या आसाचे उत्तर टोक हे अचूकपणे ध्रुवाच्या स्थानाकडे रोखलेले असते. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील निरीक्षकांना तो क्षितिजाच्या वरच्या बाजूला ठराविक कोनांतरावर दिसतो. हा कोन म्हणजे निरीक्षकाच्या स्थानाचा अक्षांश असतो. पृथ्वीच्या विषुववृत्तावरून ती क्षितिजाला टेकलेला दिसतो, तर दक्षिण गोलार्धातून अजिबात दिसत नाही .

खगोलशास्त्र

[संपादन]

पृथ्वीवर उत्तर गोलार्धामध्ये उत्तर दिशेस पाहिल्यास क्षितिजापासून थोडासा वर (मुंबईतून साधारण १९ अंश कोनावर) ध्रुवतारा दिसतो. बऱ्याच लोकांना ध्रुवतारा तेजस्वी असावा असे वाटते, पण प्रत्यक्षात तो दिसायला एक साधारण तारा आहे. संपूर्ण रात्रभर ध्रुवताऱ्याचे निरीक्षण केल्यास इतर सर्व तारे पुढे सरकतील पण ध्रुवतारा मात्र त्याच ठिकाणी असल्याचे दिसते.

पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास २६,००० वर्षे लागतात. या २६,००० वर्षांमध्ये पृथ्वीचा अक्ष आकाशामध्ये एक फेरी पूर्ण करताना तो अक्ष निरनिराळ्या दिशेने रोखला जातो आणि परिणामी ध्रुवतारा २६००० वर्षात उत्तरबिंदूला एक छोटीशी प्रदक्षणा घालतो.[] हा काळ मानवी आयुष्याच्या मानाने फार मोठा असल्याने, माणसाला त्याच्या आयुष्यात ध्रुव तारा स्थिर असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.

संदर्भ यादी

[संपादन]
  1. ^ "ध्रुव - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2019-09-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Pole star". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-02.
  3. ^ "Avakashvedh - First Marathi Website on Astronomy". www.avakashvedh.com. 2019-09-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-03 रोजी पाहिले.

हे पण् पहा

[संपादन]

विष्णू ,लक्ष्मी,दशावतार , सात्त्विक आहार , कृतयुग किंवा सत्य युग,श्रीलक्ष्मी नारायण