काष्टा साडी किंवा नऊवारी साडी ही साडी नेसण्याची एक शैली आहे. महाराष्ट्रीय धोतर ज्या प्रकारे परिधान केली जाते त्याचप्रकारची ही शैली आहे. काष्ट या शब्दाचा अर्थ साडीला पाठीमागे बांधणे असा होतो.[१][२] ही साडी सामान्यतः नऊ गजांचे एकच कापड वापरून नेसली जात असल्याने तिला नऊवारी असे देखील संबोधले जाते.[३] त्याला अखंड वस्त्र असे संबोधले जाते, याचा अर्थ त्याला आधार देण्यासाठी इतर कोणत्याही पोशाखाची आवश्यकता नसते. हा पोशाख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण विविध क्षेत्रातील महिलांनी तो परिधान केला आहे.[४][५] हा पोशाख केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परिधान केला जात नाही, तर महिलांनी भूतकाळात या पोशाख युद्धे देखील लढली आहेत आणि अजूनही नऊवारी परिधान करून अनेक महिला शेतात काम करतात.[६]
नऊवारी साडी ही पुरुषाच्या धोतराप्रमाणे दिसते. हिची लांबी नऊ वार अथवा गज -(९ यार्ड (८.२ मी) अंदाजे)-[७] असल्याने हिला नऊवारी साडी असे म्हणले जाते. ह्या नऊवारी साड्या मुख्यत्वे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील व शेतकरी महिला नेसतात. ही साडी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इ. राज्यात मुख्यत्वे आढळून येते.
शेतात किंवा इतर कामे करणाऱ्या बायका ही साडी घोट्याच्यावर किंवा गुडघ्याखालपर्यंत नेसतात; तर घरांत, समारंभांसाठी किंवा इतर ठिकाणी ही साडी घोट्याखालपर्यंत नेसली जाते. या साडीच्या दुभागलेल्या काष्टा पद्धतीमुळे काम करण्यास, जलद वावर करण्यास, इतकेच नव्हे तर घोडेस्वारी करण्यासाठीही ही साडी सुरक्षित समजली जाई/ जाते. इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा यांची नऊवारी साडी ही वेशभूषा होती आणि या वेशभूषेतूनच त्या रणांगणावर लढल्या.[ संदर्भ हवा ]
|दुवा=
value (सहाय्य). २९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |