नरेश बेदी हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, बेदी बंधूंमधील ज्येष्ठ बंधू आहेत.[१] 'वाईल्डस्क्रीन पांडा पुरस्कार' मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती आहेत.[२] २०१५ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[३]
नरेश बेदी यांचा जन्म हरिद्वार, उत्तराखंड येथे झाला. त्यांचे वडील रमेश बेदी वन्यजीव छायाचित्रकार तसेच लेखक होते. त्यांनी या विषयावर ७४ पुस्तके लिहिली.
लहानपणापासूनच नरेश बेदी यांना छायाचित्रण कलेत रुची निर्माण झाली. आपले धाकटे बंधू, राजेश बेदी यांच्यासह त्यांनी वडिलांनी भेट दिलेल्या रोलेकॉर्ड कॅमेऱ्यावर छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. लहान असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हरिद्वार भेटीची छायाचित्रे काढण्याची संधी त्यांना मिळाली.
बेदी यांनी काढलेल्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन वयाच्या १८ व्या वर्षी मॅक्समुल्लर भवनच्या प्रायोजकत्वाखाली भरवण्यात आले.