नहुष हा कुरु वंशाचा पराक्रमी राजा होता. ययातीचा पिता होता. याने स्वर्गाचा पराभव करून इंद्राला पण लढाईत हरवले. स्वर्गाचा पराभव केल्यानंतर सर्व ब्रम्हऋषी नहुषाचे दास झाले होते व ब्रम्हऋषींची पालखी नहुषाच्या सेवेला होती. स्वर्गाचा अधिपती झाल्यानंतर इंद्राची पत्नी आपली पत्नी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली व इंद्राणी कडे जाताना एके दिवशी तो पालखीमध्ये आरूढ झाला, ही पालखी वयोवृद्ध ब्रम्हऋषींकडून हलत नव्हती. त्यामुळे नहुषाने चिडून जाउन त्याच्या पुढील अगस्ती ऋषींना पालखी हलवण्यासाठी लाथ मारली. त्यावर अगस्ती ऋषींनी चिडून जाउन नहुषाला शाप दिला की या नहुषाची मुले व वंश कधीही सुखी होणार नाही.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |