हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नायनार किंवा नायनमार (तमिळ:நாயன்மார்கள் : नायनमार्गळ )हे शैव संप्रदायाचे तमिळ संतकवी होते.ह्यांचा कार्यकाळ पाचव्या आणि सहाव्या शतकादरम्यान होता.त्यांची एकूण संख्या ६३ इतकी होती.सर्व नायन्मार गुरू हे मुक्तात्मे होते अशी मान्यता आहे.ह्यांची स्वतंत्र देऊळे असून त्यात त्यांच्या मूर्त्यांची इतर सर्व देवतांप्रमाणे पूजा केली जाते.ह्या संताचा उल्लेख सेक्किळार नावाच्या संतकवींच्या पेरियपुराण मध्ये आढळतो.ह्यांचे जीवन चरित्र तेलुगू भाषेत शिवभक्त चरितमु ह्या नावाने प्रसिद्ध आहे.