हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नारायण दत्त तिवारी | |
---|---|
जन्म |
ऑक्टोबर १५,इ.स. १९२५ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
नारायण दत्त तिवारी (ऑक्टोबर १८,१९२५ - ऑक्टोबर १८,२०१८ ) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश राज्याचे इ.स. २००७ पासून राज्यपाल होते. ते मार्च इ.स. २००२ ते मार्च इ.स. २००७ या काळात उत्तरांचलचे आणि जानेवारी इ.स. १९७६ ते एप्रिल इ.स. १९७७, ऑगस्ट इ.स. १९८४ ते सप्टेंबर इ.स. १९८५ आणि जून इ.स. १९८८ ते डिसेंबर इ.स. १९८८ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अशाप्रकारे दोन राज्यांचे मुख्यमंत्रापद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला.
ते इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. त्याचबरोबर जून इ.स. १९८० ते जुलै इ.स. १९८१ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर ऑक्टोबर इ.स. १९८० ते फेब्रुवारी इ.स. १९८३ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, उद्योगमंत्री,अवजड उद्योगमंत्री आणि कायदामंत्री ही पदे भूषविली. तसेच जून इ.स. १९८५ ते ऑक्टोबर इ.स. १९८६ या काळात ते पेट्रोलियम मंत्री,ऑक्टोबर इ.स. १९८६ ते जुलै इ.स. १९८७ या काळात ते परराष्ट्रमंत्री आणि जुलै इ.स. १९८७ ते जून इ.स. १९८८ या काळात ते अर्थमंत्री होते.