निवारी जिल्हा (याला हिंदीत निवाडी असेपण म्हणतात)हा भारतातील मध्यप्रदेश राज्याचा एक नवनिर्मित जिल्हा आहे. हा जिल्हा मध्यप्रदेशातील सध्या अस्तित्वात असणाऱ्या टिकमगड या जिल्ह्यास विभागून बनविण्यात आला आहे.मध्यप्रदेशमधील निवारी,पृथ्वीपूर व ओरच्छा हे तीन तालुके या जिल्ह्यात राहतील. या जिल्ह्याचे निर्मितीने मध्यप्रदेशमधील जिल्ह्यांची संख्या ही ५२ इतकी झाली आहे.हा जिल्हा १ऑक्टोबर २०१८पासून अस्तित्वात आला.[१][२][३]