नेम्मारा वेला किंवा नेम्मारा-वल्लंगी वेला हा केरळ राज्याच्या पलक्कड जिल्ह्यातील चित्तूर तालुक्यातील नेम्मारा गावातील वार्षिक उत्सव आहे.[१][२]
वेला हा महोत्सव पलक्कड आणि त्रिसूर येथे उन्हाळ्यात साजरा होणारा सुगीच्या हंगामानंतरचा उत्सव आहे. या परिसरात भात(तांदूळ) हे मुख्य अन्य(?) शेतीतून घेतले जाते. भात कापणी झाल्यानंतर जमीन मोकळी झालेली असते. या मोकळ्या जमिनीवर हा उत्सव केला जातो. ग्रामदेवतेने म्हणजे देवी भगवतीने असुराचा वध केल्याच्या विजयाचा उत्सव या निमित्ताने साजरा केला जातो.
केरळातील मीनम या मल्याळी महिन्यात २० तारखेला म्हणजे ग्रेगोरीअन कालगणनेनुसार २ किंवा ३ एप्रिलला हा सण साजरा होतो.[३] नेमारा आणि वल्लांगी असे गावातील २ गट असतात. त्यांची गावात स्वतंत्र देवळे असतात. तसेच गावात एक सार्वजनिक देऊळही असते. उत्सवाची सुरुवात मुख्य सणाच्या १० दिवस आधी केली जाती. यानिमित्त गावात निशाण फडकविले जाते. असे निशाण गावात लागल्यानंतर कुणीही स्थानिक ग्रामस्थ गावाची वेस ओलांडून बाहेर जाऊ शकत नाही असा संकेत पाळला जातो.
नेमारा गट आपापली सुरुवात मंदम वेला येथून करतात तर वल्लांगी गट शिव मंदिरापासून आपली यात्रा सुरू करतात. दोन्ही गटांचे स्वतंत्र असे हत्तींचे कळप असतात. नेलीकुलांगारा या देवीच्या देवळात हे दोन्ही गट आपापले हत्ती सुशोभित करून घेऊन येतात. या हत्तींवर भगवती देवीची सुशोभित मूर्ती ठेवलेली असते.[४]शेतीची जमीन मोकळी असल्याने माणसांची गर्दी त्यात सामावली जाते.[५] हा उत्सव पहायला जवळपासच्या विविध तालुक्यातून लोक उपस्थित राहतात. अनेक कुटुंबांचा हा एकत्र येण्याचा उत्सवही असतो. धर्म किंवा जात अशा बंधनांच्या पलीकडे जाऊन हा उत्सव साजरा केला जातो. परदेशी पर्यटकसुद्धा हे आकर्षण पाहण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात.
अना पंदाल नावाचे आणखी एक आकर्षण येथे असते. एक धनुष्याकृती तयार करून तिची फुले आणि दिवे यांनी सजावट केली जाते. दोन्ही गट कोणती आरास सादर करतात हे पाहणे हा सुद्धा एक औत्सुक्याचा विषय असतो. हत्ती मिरवणूक याच्या जोडीने होणारी आतषबाजी यासाठी दोन्ही गटात चुरस लागते. दरवर्षी आपली रोषणाई आणि फटाके यांचे सादरीकरण (!) उत्तम होईल यासाठी दोन्ही गट प्रयत्न करतात. याची पूर्वतयारी आणी नियोजन पुष्कळ दिवस आधीपासून केली (!) जाते.[६]
जवळचा विमानतळ- कोचीन किंवा कोइंबतूर
जवळचे रेल्वे स्थानक- पलक्कड/त्रिचूर
विमानतळापासून अंतर- ६० किलोमीटर
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |title=
(सहाय्य)
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)