पंचामृत

पंचामृत हा खाद्यपदार्थ आहे.पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे शरीर अथवा मन शुद्धीकरण करण्यास प्यायचे द्रव्य.

दोन प्रकारच्या पदार्थाना "पंचामृत" अशी संज्ञा वापरली जाते.

तोंडी लावण्याचा पदार्थ[संपादन]

दाण्याचे कूट, तीळ, गूळ, काजू, धने आणि जिरे पूड, सुके खोबरे, चिंचेचा कोळ या मिश्रणाला फोडणी देऊन चटणी सारखा पदार्थ केला जातो. त्यालाही पंचामृत म्हटले जाते.[१]

देवपूजेत[संपादन]

गाईचे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणातून पंचामृत बनते.[२] सोळा उपचारात पंचामृतस्नान हा एक देवपूजेतील उपचार मानला गेला आहे.[३] पूजा झाल्यानंतर देवतेचे तीर्थ म्हणून पंचामृत सेवन करण्याची पद्धती आहे.[४]

आहारदृष्ट्या महत्त्व[संपादन]

गर्भवती स्त्रीने तिच्या आणि गर्भाच्या उत्तम वाढीसाठी दररोज पंचामृत म्हणजे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण प्यावे असे सांगितले आहे.[२] ज्योतीसतत्त्व या ग्रंथात गर्भवतीला दिनशुद्धी पाहून पंचामृत प्यायला द्यावे असे सांगितले आहे.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ The Beginner S Cook Book: Vegetables (इंग्रजी भाषेत). Global Vision Publishing House. 2004. ISBN 9788182200371.
  2. ^ a b Arora, Akankssha (2018-10-16). Genius in Making (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 9781644291436.
  3. ^ Joshi, Mahadeoshastri Sitaram (1968). Pūjāvidhāna. Jñānarāja Prakāśana.
  4. ^ Sadaiv, Shashikant (2018-05-22). Hindu Sanskriti Aur Gaye (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789352960538.
  5. ^ जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ. pp. ३०३.