घरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर आणि सांडपाण्यावर आधारित उपयुक्त भाजीपाल्यांची बाग म्हणजे परसबाग होय. परसबाग करताना आपला हेतू असतो तो आपल्या रोजच्या खाण्यामध्ये आवश्यक असलेला भाजीपाला पिकवणे. या वेळी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रकारची भाजी कशी घेता येईल, याचा विचार करून जागेचे नियोजन करावे. हे नियोजन करताना सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार भाजीपाला पिकांची निवड करावी लागते.
परसबागेचे प्रकार हे त्याच्या जगेवरून व माणसांच्या संख्यावर अवलबून असते.
२० गुंठे ते 1 एकर या जागेमध्ये केलेली परसबाग. यामध्ये वड , पिंपळ, औषधी वनस्पती , फळझाडे, फुलझाडे, वेली इत्यादी लागवड केली जाऊ शकतो.
५ गुंठे या जागेमध्ये केलेली परसबाग.
१.५ ते ५ गुंठे या जागेमध्ये केलेली परसबाग.या मध्ये हंगामी भाजीपाला, फळभाज्या इत्यादी लागवड केली जाऊ शकतो.
पॉलिटन पेपर अंथरून त्यवर माती टाकून तयार केलेली परसबाग.
परसबागेत वृक्षवर्गीय फुलझाडे लागवडलावायची झाल्यास पारिजातक, सोनचाफा, झुडूपवर्गीय लावायची झाल्यास जास्वंद, गुलाब, मोगरा, शेवंती, अबोली, वेलवर्गीय जाई, जुई, चमेली तर कंदवर्गीय निशिगंध, झिनिया, लिली ही फुलझाडे लावता येतील. तर घरगुती औषधांसाठी अडुळसा, वेखंड, गवती चहा, तुळस या औषधी वनस्पतींचा परसबागेत समावेश करता येईल.फुलझाडांना भरपूर सूर्यप्रकाशाची व मोकळ्या हवेची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना समोर अंगणात लावले पुरेसा सूर्यप्रकाश नसेल तर झाडांची चांगली वाढ होत नाही
भाजीपाल्याची लागवड करावयाची असल्यास त्यास चार ते सहा इंच खोली पुरेशी होते. पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू अशा पालेभाज्यांची लागवड करताना बियाणे किंवा देठाची लागवड केली तरी चालते. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की ती कापून घ्यावीत. खोडे तसेच जमिनीत ठेवावीत. पुन्हा वीस ते पंचवीस दिवसांत त्यास नवीन फुटवा येतो व आपल्याला भाजी मिळते.
फळभाजीची लागवडरोपांची लागवड साधारणत: सायंकाळी करावी, म्हणजे रात्रभरात ती मूळ धरतात. शक्य झाल्यास त्यांना सुरुवातीला दोन-तीन दिवस अर्ध ऊन-सावलीत ठेवावीत म्हणजे तग धरतात. वांगी, मिरची आदी फळवर्गीय झाडं यांना फळं येऊन गेलीत की ते महिनाभराचा विसावा घेतात. पुन्हा फळे येतात. झाड जुनं झालं की त्यास खोडापासून चार इंचांवर छाटावं त्यास पुन्हा बहर येतो.
विविध वेलवर्गीय भाज्या लागवड या वाफा पद्धतीत छान बहरतात. वेलांच्या वाढीचं, त्याला लागणाऱ्या फळांचं एक नसर्गिक तंत्र आहे. वेल हा मातीच्या पृष्ठभागात ६ ते १० इंच खोलीपर्यंत लावलेला चालतो. पण वाफा हा लांब असावा. कारण वेलाच्या मुळ्या जितक्या लांब पसरतील तितक्याच तो वेल बहरतो.वाफा पद्धतीत वाल आणि त्याचे विविध प्रकार, कारलं, डांगर, देवडांगर, गिलके, भोपळा, दोडके, पडवळ, काकडी, तोंडली, चवळी यांचीही लागवड करता येते.[१]
जमीन नांगरणेवेळी हेक्टरी १५ ते २० टन शेणखत मिसळावे. पण प्रत्येक वेळी एवढे शेणखत उपलब्ध होत नाही. अशा वेळी ठराविक अंतर निश्चित केल्यानंतर बियाणे लागवडीसाठी खो-याच्या सहाय्याने खड्डे तयार करावेत. एका खड्डय़ात अर्धा ते एक घमेले कु जलेले शेणखत आणि १०० ग्रॅम फॉलिडॉल पावडर टाकावी. सर्व खताची सर्वच पिकांसाठी एक तृतीयांश मात्रा, नत्र म्हणजेच युरिया, पूर्ण मात्र, स्फुरद-सिंगल सुपर फॉस्फेट व पालाश म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश, लागवडीचे वेळी मातीत चांगल्या प्रकारे मिसळेल अशा पद्धतीने द्यावी. तसेच एक तृतीयांश नत्राची मात्रा म्हणजेच युरिया लागवडीनंतर एक महिन्याने व शेवटची एक तृतीयांश नत्राची मात्रा म्हणजेच युरिया झाड फुलो-यावर आल्यानंतर फळे येण्यास सुरुवात होते, अशा वेळी द्यावी. पावसाळी हंगामात भाजीपाला पिकांना पाण्याची गरज भासत नाही. परंतु आठ दिवसांमध्ये जास्त दिवस पाऊस पडला नाही तर पाण्याची सोय करावी. तसेच अतिउपसा झाल्यास पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी.[२]