पाकिस्तान क्रिकेट संघाने सध्या तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१][२][३]ब्रिस्बेनच्याद गब्बावरील १ली कसोटी गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळवण्यात आली.[४] १ल्या कसोटीची पुर्वतयारी म्हणून पाकिस्तानची कियाद-ए-आझम ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलियाच्या शेफिल्ड शील्ड २०१६-१७ मोसमाची पहिली फेरी दिवस/रात्र सामन्यांची खेळवली गेली.[५][६].
हा पाकिस्तानचा १७वा ऑस्ट्रेलिया दौरा होता, ह्या आधी २००९-१०च्या मोसमात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर पाकिस्तानला कसोटी आणि एकदिवसीय मालिकेमध्ये व्हाईटवॉश मिळाला होता तसेच एकमेव टी२० सामन्यात सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला होता.[७] ह्याआधी दोन्ही संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१४-१५च्या मोसमात आमनेसामने आले होते, त्यावेळी पाकिस्तानने कसोटी मालिका २-० अशी जिंकली परंतु ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली.[८] ह्या आधीच्या दोन मालिका गमावून ऑस्ट्रेलियाचा संघ ह्या कसोटी मालिकेत उतरला होता – श्रीलंकेविरुद्ध परदेशी[९] आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी.[१०] ते ह्या एकदिवसीय मालिकेमध्ये उतरतील ते, श्रीलंकेविरुद्धचा ४-१ अशा एकदिवसीय मालिका विजय,[११]आयर्लंडविरुद्ध ९ गडी राखून विजय[१२] आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध परदेशातील ५-० मालिका पराभव – एकदिवसीय मालिकेमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वच्या सर्व पाच सामन्यांमध्ये पराभूत झाला.[१३] परंतु ह्या मालिकेच्या अगदी आधी ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन, चॅपेल-हॅडली चषक पुन्हा मिळवला.[१४]
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी खिशात घातली. त्यांचा तिसऱ्या कसोटीमधील विजय हा त्यांचा पाकिस्तानविरुद्ध सलग १२ वा कसोटी विजय होता.[१५] ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेमध्ये ४-१ असा विजय मिळवला[१६]
पावसामुळे १ल्या दिवशी चहापान लवकर करण्यात आले आणि शेवटच्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.[२९] २ऱ्या दिवशी जेवण लवकर घेण्यात आले, आणि मधल्या सत्रात खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे ५ः१५ वाजता खेळ थांबवण्यात आला. ३ऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थोडा सकाळी उशीरा १०:३५ वाजता सुरू झाला. ४थ्या दिवशी चहापान लवकर करण्यात आले आणि शेवटच्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
अझहर अलीच्या (पा) २०१६ मध्ये १००० कसोटी धावा पूर्ण.[३०] अलीच्या पहिल्या डावातील नाबाद २०५ धावांची खेळी ही पाकिस्तानी फलंदाजातर्फे ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी वैयक्तिक[३१] आणि मेलबर्न क्रिकेट मैदानावरील पाहुण्या खेळाडूने केलेली दुसरी सर्वात मोठी कसोटी धावसंख्या.[३२]
अली आणि सोहेल खानने केलेली ११८ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची ८व्या गड्यासाठीची सर्वोत्कृष्ट भागीदारी.[३३]
ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातील ६२४ धावसंख्या ही मेलबर्न क्रिकेट मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या.[३४]
डेव्हिड वॉर्नरच्या (ऑ) १७९ धावा ही त्याची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय कामगिरी. तसेच एकदिवसीय इतिहासात सर्वात जास्त वेळा १५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी (५ वेळा).[४७]
ट्रेव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांची २८४ धावांची भागीदारी ही दुसरी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय सलामी तर ऑस्ट्रेलियासाठी कोणत्याही गड्यासाठीची सर्वोत्कृष्ट भागीदारी[४७]
षटकांची गती कमी राखल्याने पाकिस्तानी कर्णधार अझहर अलीवर एका सामन्याची बंदी आणि सामन्याच्या मानधनाच्या ४०% दंड ठोठावण्यात आला. तसेच संपूर्ण संघाला सामन्याच्या मानधनाच्या २०% दंड ठोठावण्यात आला.[४७]