पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. हा महाराष्ट्रातील पाणीपुरवठा आणि जलस्रोतांचे व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे. गुलाबराव पाटील हे सध्या पाणीपुरवठा मंत्री आहेत.
सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र.ळाकानि १०१५/सीआर २८९/१८(र.व.क.), दिनांक ९ नोव्हेंबर , १९९५ नुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या प्रशासकीय विभागाची निमिर्ती झाली.
पाणी पुरवठा व स्वच्छेते संबंधित सर्व धोरणांसंबंधित बाबी, अंमलबजावणी करणे,
१) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग(खुद्द)ची आस्थापना, विभागाच्या अधिपत्याखालील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रण, महाराषट्र जीवन प्राधिकरण, जलस्वराज्य टप्पा-२, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांची आस्थापना
२) पिण्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमांबाबत धोरण ठरविणे, पाणी पुरवठा स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी
३) पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम राबविण