पी. सदाशिवम् | |
---|---|
![]() न्या. पी. सदाशिवम् | |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | शासकीय विधी महाविद्यालय, चेन्नई |
कार्यकाळ | १९ जुलै २०१३ ते २६ एप्रिल २०१४ |
पलानिसमय सदाशिवम् (जन्म २७ एप्रिल १९४९) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. त्यांनी अल्तमश कबीर यांच्यानंतर १९ जुलै, इ.स. २०१३ रोजी कार्यभार स्वीकारला.[१] ते भारतचे चाळिसावे व तामिळनाडूतील दुसरे सरन्यायधीश आहेत.[२]. २०१४पासून ते केरळचे राज्यपाल आहेत. सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले ते पहिले सरन्यायाधीश आहेत.
सदाशिवम् यांचा जन्मईरोडे जिल्ह्यातील भवनी जवळील कडप्पनल्लूर या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला.पलानिसमय व नात्चीम्मल हे त्यांचे आईवडील.त्यांनी शासकिइय विधी महाविद्यालय, चेन्नई येथून पदवी संपादित केली. बी.ए. पदवी मिळवल्यानंतर ते त्यांच्या कुटूंबातील व गावातील पहीले पदवीधर बनले.[३]
सदाशिवम् यांनी २५ जुलै १९७३ रोजी वकील म्हणून मद्रास न्यायालयात कारकिर्दीला सुरुवात केली.त्यानंतर त्यांची अतिरिक्त सरकारी वकील व नंतर विषेश सरकारी वकील म्हणून मद्रास उच्च न्यायालयात नेमणूक करण्यात आली.त्यांनी काही सरकारी संस्था,बँका यांना न्यायसल्लागार म्हणूनही काम केले.त्यांची ८ जुलै १९९६ रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली, नंतर त्यांना २० एप्रिल २००७ रोजी [पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पाठवण्यात आले.२१ ऑगस्ट २००७ रोजी त्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.[४]
न्या. सदाशिवम् यांनी परंपरेला छेद देणारे अनेक निर्णय घेतले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |