पूजा धांडा | |||||||||||||||
वैयक्तिक माहिती | |||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव | पूजा धांडा | ||||||||||||||
राष्ट्रीयत्व | भारतीय | ||||||||||||||
निवासस्थान | भारत | ||||||||||||||
जन्मदिनांक | १ जानेवारी, १९९४ | ||||||||||||||
जन्मस्थान | बुदाना, जिल्हा:हिसार,हरियाणा,भारत | ||||||||||||||
उंची | १६२ सेमी | ||||||||||||||
वजन | ५७ किग्रॅ | ||||||||||||||
खेळ | |||||||||||||||
देश | भारत | ||||||||||||||
खेळ | कुस्ती | ||||||||||||||
प्रशिक्षक | सुभाष चंदर सोनी | ||||||||||||||
|
पूजा धांडा (जन्म: १ जानेवारी १९९४) ही हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बुदाना गावातील एक फ्रीस्टाईल कुस्तीगीर आहे. पूजाने बुडापेस्ट येथे झालेल्या २०१८ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये ५७ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले होते. तिने २०१० च्या उन्हाळी युवा ऑलिम्पिकमध्ये आणि २०१८ मध्ये गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये अनुक्रमे ६० किलो आणि ५७ किलो वजनगटांत रौप्य पदके जिंकली.२०१४ च्या आशियाई कुस्ती स्पर्धेतही तिने कांस्य पदक जिंकले होते. [१]क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्कारने गौरविले आहे.[२]
पूजाच्या आईचे नाव कमलेश आहे. तिचे वडील अजमेर हे स्वतः एक खेळाडू होते. लहानपणापासूनच पूजाचा कल सर्वसाधारणपणे खेळांकडे आणि कुस्तीकडे असला, तरी सुरुवातीला तिने जुडोमध्ये यश मिळवले. २००७ मध्ये कुस्ती महासंघाद्वारे मान्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी एक विशिष्ट वय गाठल्यावर तिला दोनपैकी एक खेळ निवडायचा होता. त्यावेळी पूजाने कुस्ती हा खेळ निवडला आणि का निर्णय सार्थ ठरवत राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली. एवढेच नव्हे तर २००७ मध्ये हैदराबाद येथे आशियाई कॅडेट जुडो चॅम्पियनशिपमध्ये तिने तिचे पहिले कांस्य पदक मिळवले, आणि २००८ मध्ये तिने आणखी चांगली कामगिरी करत त्याच स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.[३][४]
एवढे यश संपादन करूनही भारताचे माजी कुस्तीगीर आणि प्रशिक्षक कृष्णा शंकर बिश्नोई यांनी तिला जुडोपेक्षा कुस्तीमध्ये कारकीर्द करण्याचा सल्ला दिला व त्यासाठी प्रोत्साहनसुद्धा दिले.[५] पूजाने त्यांचा सल्ला ऐकला आणि २००९मध्ये हिसार येथे सुभाष चंदर सोनी यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अगदी वर्षभरात पूजाने २०१०मध्ये सिंगापूरमधील समर युथ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाला गवसणी घातली.
२००९ मध्ये कुस्तीकडे वळल्यानंतर पूजाने पहिले आंतराष्ट्रीय यश २०१० च्या युवा ऑलम्पिकमध्ये ६० किलो वजन गटात मिळवले.[६] २०१३ मध्ये तिने प्रथमच जागतिक कुस्ती स्पर्धेत भाग घेतला, पण पहिल्या फेरीत पराभवानंतर ती बाहेर पडली.[७] मात्र, त्यानंतर त्याच वर्षी तिने बबिता फोगाटचा पराभव करत राष्ट्रीय कुस्ती जेतेपद पटकावले. त्यानंतर २०१४ मध्ये अस्ताना येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले. २०१७ मध्ये पूजाने नॅशनल चॅम्पिअनशिपच्या रिंगणात विजयासह शानदार पुनरागमन केले. २०१८ च्या प्रो-रेसलिंग लीगच्या तिसऱ्या पर्वात तिने ऑलिम्पिक विजेती हेलन मारौलिस हिचा पराभव केला.[८] त्यानंतर तिने राष्ट्रकुल खेळांमध्ये रौप्यपदक आणि त्याच वर्षी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.
कुस्तीमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पूजाला २०१९ मध्ये भारत सरकारच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.[९]