पोश्टर बॉईज | |
---|---|
दिग्दर्शन | समीर पाटील |
निर्मिती | श्रेयस तळपदे |
प्रमुख कलाकार | दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव, हृषिकेश जोशी |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १ ऑगस्ट २०१४ |
निर्मिती खर्च | २ करोड |
एकूण उत्पन्न | ८.५ करोड |
|
पोश्टर बॉईज हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून समीर पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ही चारुदत्त भागवत यांची असून याची निर्मिती श्रेयस तळपदे याने केली आहे. या चित्रपटात पूजा सावंत, नेहा जोशी, अनिकेत विश्वासराव, दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट १ ऑगस्ट २०१४ या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला.