प्रणती नायक (६ एप्रिल, १९९५, पश्चिम मिदनापूर, पश्चिम बंगाल, भारत - ) [१] एक भारतीय कलात्मक जिम्नॅस्ट आहे. ती २०१९ आशियाई विजेतेपद स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात कांस्यपदक विजेती आहे. दीपा कर्माकर आणि अरुणा रेड्डी यांच्यानंतर व्हॉल्टवर आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय जिम्नॅस्ट आहे. तिने २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरणारी ती दुसरी भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे. ती २०१९ची भारतीय अष्टपैलू जिम्नॅस्टिक्स चॅम्पियन देखील आहे. तिने २०१४ राष्ट्रकुल खेळ आणि २०१८ राष्ट्रकुल खेळ आणि २०१४ आणि २०१८ आशियाई गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने २०१४, २०१७, आणि २०१९ च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता .
नायकचे वडील २०१७ पर्यंत पश्चिम बंगालमध्ये राज्य परिवहन बस चालक म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी कार्यालयात नोकरी पत्करली. तिची आई गृहिणी आहे. [२] सहा वर्षांची असताना प्रणिती ने जिम्नॅस्टिक्स शिकण्यास सुरुवात केली. [३] २००३मध्ये प्रशिक्षणासाठी ती कोलकाता येथे गेली आणि तिची प्रशिक्षक मिनारा बेगम यांनी तिचा राहण्याचा खर्च उचलला. [४] ती बंगाली, इंग्रजी आणि हिंदी बोलते. [१]
कोव्हिडमुळे २०२१ आशियाई चॅम्पियनशिप रद्द झाल्यानंतर नायकला २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये श्रीलंकेच्या मिल्का गेहानीसह आरक्षित स्थान मिळाले. [५] दीपा कर्माकरनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी नायक दुसरी महिला जिम्नॅस्ट होती. [२] [६] भारतातील कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान तिची प्रशिक्षण संस्था एका वर्षासाठी बंद राहिल्याने ऑलिम्पिकच्या आधी दोन महिनेच ती सराव करू शकली होती. [७] ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत तिने एकूण ४२.५६५ गुणांसह ७९वे स्थान मिळवले. [८] ती एकाही अंतिम फेरीसाठी पात्र ठरली नाही. [९]
<ref>
tag; नाव "gc2018" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
<ref>
tag; नाव "bridge" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे