या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
प्रशांती सिंग हिचा जन्म ५ मे १९८४ मध्ये वाराणसी , उत्तर प्रदेश येथे झाला.ती भारतीय महिला बास्केटबॉल संघाची शुटिंग गार्ड आहे.२०१७ मध्ये भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने तिला अर्जुन पुरस्काराने गौरविले आहे.[१] भारताने तिला दिलेला बास्केटबॉलमधील प्रथम महिला खेळाडू असून तिला राष्ट्रीय नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.[२]
प्रशांती २००२ मध्ये भारतीय महिला बास्केटबॉल संघात रुजू झाली आणि लवकरच त्याची कर्णधार झाली.[३] प्रशांती सिंग ही भारतातील बास्केटबॉलमधील सर्वात आकर्षक महिला आहे.तीची बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि आयएमजी-रिलायन्स यांच्याकडून निवड करण्यात आली.भारताच्या पहिल्या चार 'अ' श्रेणीतील खेळाडूंपैकी ती एक खेळाडू आहे.
प्रशांती सिंगने राष्ट्रीय चॅंपियनशिप, राष्ट्रीय खेळ आणि फेडरेशन कपमध्ये २३ पदके जिंकली आहेत.[४]