प्रिया तेंडुलकर | |
---|---|
जन्म |
प्रिया विजय तेंडुलकर ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ |
मृत्यू |
सप्टेंबर १९, इ.स. २००२ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय(चित्रपट, नाटक, टीव्ही); कथालेखन |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख चित्रपट |
गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | रजनी |
वडील | विजय तेंडुलकर |
प्रिया तेंडुलकर (ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ - सप्टेंबर १९, इ.स. २००२) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.
प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.
प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्मेदार कौन, किस्से मियॉं बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.