प्रीता रेड्डी या अपोलो हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. हे हॉस्पिटल भारतातील सर्वात मोठ्या इस्पितळांपैकी एक आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये, वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनी मेडिट्रोनिकच्या स्वतंत्र संचालक म्हणून रेड्डी यांची निवड करण्यात आली.[१][२]
प्रीता रेड्डी यांनी मद्रास विद्यापीठामध्ये रसायनशास्त्रातील बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी पूर्ण केली आणि अन्नामलाई विद्यापीठातून लोक प्रशासन पदवी प्राप्त केली.[३][४]
त्यांच्या तीन बहिणी आहेत, सुनीता रेड्डी, संगीता रेड्डी आणि शोबाना केमिनिनी आणि सर्व अपोलो हॉस्पिटलमधील संचालक म्हणून सेवा देत आहे.