प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्स ޕްރޮގްރެސިވް ޕާރޓީ އޮފް މޯލްޑިވްސް: ޕީ.ޕީ.އެމް | |
---|---|
नेता | अब्दुल्ला यामीन |
स्थापना | सप्टेंबर २०११ |
मुख्यालय | माले, मालदिव्स |
राजकीय तत्त्वे |
इस्लामवाद |
रंग | ec008c |
प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्स (मालदीव्सचा पुरोगामी पक्ष) तथा पी.पी.एम. हा मालदीव मधील एक राजकीय पक्ष आहे.
हा पक्ष मौमून अब्दुल गयूम ह्याने २०११ साली त्याच्या आधीच्या पक्षा(धिवेही राय्यीठुंगे पार्टी-डीआरपी)मधून राजीनामा दिल्यावर स्थापन केला. त्याने त्याच्या पहिल्या पक्षाला सोडतांना नव्या नेत्यांचा 'वैचारिक भ्रष्टाचार' असे कारण दिले. पी. पी. एम. हा पहिल्यांदा डी. आर. पी. मधल्या एका झेड. डी. आर. पी. नावाच्या गटातून गयूम द्वारे सुरू करण्यात आला होता. पक्षातील गयूम व अहमद थास्मीन अली ह्यांच्यातील अंतर्गत वादांमुळे हा पक्ष तुटला.
४ सप्टेंबर २०११ला गय्यूम ने डी. आर. पी. मधून राजीनामा देऊन झेड डी. आर. पी.ची स्थापना केली. झेड डी. आर. पी. हा गय्यूमच्या मते एक 'नव भ्रष्टाचार मुक्त व असहिष्णु' स्वातंत्र्य पक्ष आहे. दुसऱ्याच दिवशी त्याने पी. पी. एम.चा आराखडा सदर केला.
८ ऑक्टोबर २०११ला त्याच्या प्रस्तावित पक्षाला निवडणूक आयोगाकडून परवाना मिळाला. परवान्यानुसार पक्षाला सरकारसोबत नोंद करण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. [१][२][३][४]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ऑगस्ट २०१२ला पी पी एम ने माल्दिव्हिअन डेमोक्रॅटिक पक्ष (मालदीवचा मुख्य विरोधी पक्ष) यांच्यावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीकडून दबाव आणण्याबाबत आरोप लावला. त्यांने २०१२चा समितीचा माल्दीव्ससाठीचा अहवालाला 'गंभीर व चिंताजनक' म्हणले. एम डी पी ने समलिंगी अधिकार व धार्मिक स्वातंत्र्याविरुद्ध संयुक्त राष्ट्रावर दबाव आणला असल्याचाही आरोप पी. पी. एम. ने केला.[५][६]
१७ नोव्हेंबर २०१३ मध्ये पी पी एम हा मालदीवचा सत्ताधारी पक्ष झाला. त्यांचा उमेदवार यामीन अब्दुल गय्यूम (माय्मूनचा सावत्र भाऊ) हा २०१३ची मालदीवची राष्ट्रपती निवडणूक एम डी पीच्या उमेदवार मोहमेड नशीद ह्याला हरवून जिंकला. पी पी एम निवडणूक जिंकण्याचे कारण त्याने कासीम इब्राहिमच्या जुम्हूरी पार्टीसोबत शेवटच्या क्षणी युती केली, असा समजते.
२०१४ मध्ये, पी पी एम ने पीपल्स मजलिस मध्ये बहुमत मिळवले. त्यांने २०१४ च्या संसदीय निवडणुकांमध्ये ३३ जागा जिंकल्या, व त्यांच्या युतीमधल्या जम्हुरी पार्टीने १५, तर मालदीव डेमोक्रॅटिक अलायन्सने १५ जागा जिंकल्या
२०१५ मध्ये जम्हुरी पार्टीने व धर्माबद्दल पुराणमतवादी असलेल्या अधालात पार्टीने युती सोडली.
पक्षांनी मालदिव्झ मध्ये वेगाने प्रगती करण्याचे आश्वासन दिले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये पक्षाच्या यात्रा मंत्री मुसा झामीर ह्यांनी पुढील पाच वर्षात मालदिव्झ मध्ये २२ विमानतळे बनवण्याचे आश्वासन दिले.[७]