फन्नीता माया (१५ जून, २००४:थायलंड - ) ही थायलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. फन्नीताला २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी थायलंडच्या संघार घेतले होते परंतु तिने विश्वचषक स्पर्धेमध्ये एकही सामना खेळला नाही. त्यानंतर २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत तिची निवड करण्यात आली.