फिशहोक तथा फिशहूक (आफ्रिकान्स: Vishoek) हे दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराचे एक उपनगर आहे. हे उपनगर केप टाउनच्या पूर्व भागात समुद्रकिनाऱ्यावर असून येथे व्यावसायिक तसेच अव्यावसायिक मासेमारीचे उद्योग आहेत. येथे प्राचीन मानवी वसाहतींचे अवशेष मिळालेले आहेत.
१८८३मध्ये एडमंड रॉबर्ट्सने तत्कालीन गावाचे वर्णन देवमासे मारण्याच्या उद्योग असलेले गरीब वस्तीचे गाव असे केले होते.[१]