फ्लायअडील ( अरबी: طيران أديل;तायरान अडील) ही जेद्दाह येथील किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थित सौदी अरेबियाची किफायतशीर विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी सौदीची ध्वजवाहक विमानकंपनी सौदीयाच्या मालकीची आहे. फ्लायअडीलचे प्रवासी मुख्यत्वे देशांतर्गत प्रवास करणारी, हज आणि उमरा यात्रेकरू आणि सौदीला भेट देणारे पर्यटक असतात.[१]
सौदीयाने १७ एप्रिल, २०१६ रोजी फ्लायअडीलच्या निर्मितीची घोषणा केली [२] [३] [४] फ्लायअडीलने २३ सप्टेंबर, २०१७ रोजी जेद्दाह ते रियाध असे पहिले उड्डाण केले. [५] त्यानंतर १० जून, २०२२ दम्माम ते कैरो असे आंतरराष्ट्रीय उड्डाण केले गेले [६]
ऑगस्ट २०२३ च्या सुमारास फ्लायअडीलकडे खालील प्रकारची विमाने होती:[७][८]
विमान | एकूण | आदेश | प्रवासी | नोट्स |
---|---|---|---|---|
एरबस ए३२०-२०० | 11 | — | १८६ [९] | स्काय अंग्कोर एरलाइन्सकडून २ भाड्याने घेतलेली |
एरबस ए३२० निओ | १९ | १२ | १८६ | सौदीयाकडून २० विमानांची मागणी हस्तांतरित. [१०] |
एकूण | ३० | १२ |
१० फेब्रुवारी, २०२१ रोजी सौदी अरेबियातील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हूथी सैन्याले केलेल्या ड्रोन हल्ल्यात "HZ-FAB" नोंदणीकृत असलेले एरबस ए३२० विमानाची खराबी झाली. [११] यात कोणीही जखमी झाले नाही. विमानाची दुरुस्ती करण्यात आली आणि ते सेवेत परत आले. [१२]