Indian Television web series | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | वेब मालिका, दूरचित्रवाणी मालिका | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
| |||
![]() |
बंदिश बॅन्डिट्स ही अमृतपाल सिंग बिंद्रा आणि आनंद तिवारी यांनी तयार केलेली ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील एक भारतीय संगीतमय प्रणय-नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे जी आनंद तिवारी दिग्दर्शित आहे.[१][२] ह्याची पटकथा बिंद्रा, तिवारी आणि लारा चांदनी यांनी लिहिली होती. या मालिकेत नवोदित ऋत्विक भौमिक हा राधे राठोड या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकाराच्या भूमिकेत आणि श्रेया चौधरी ही तमन्ना शर्मा या पॉप गायकाच्या भूमिकेत आहेत, जे दोघे संगीताच्या विविध जगातून आलेले आहे. संगीत ही शिस्त विरुद्ध मुक्तीचे साधन या वादाचा शोध ह्यात आहे. या मालिकेत नसीरुद्दीन शाह, शीबा चड्ढा आणि अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
फेब्रुवारी २०१९ मध्ये या मालिकेची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आणि मुख्य चित्रीकरण हे राजस्थानमधील जोधपूर आणि बिकानेर येथे झाले. ह्याचे संगीत आणि पार्श्वसंगीत शंकर-एहसान-लॉय यांनी केले आहे व त्यांना समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.[३]