बजाज फायनान्स लिमिटेड, [१] बजाज फिनसर्व्हची उपकंपनी, भारतातील पुणे शहरात मुख्यालय असलेली एक भारतीय बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे. कंपनी ग्राहक वित्त, लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग आणि व्यावसायिक कर्ज, आणि संपत्ती व्यवस्थापनात व्यवहार करते.
पुणे, महाराष्ट्र येथे मुख्यालय असलेल्या, कंपनीच्या २९४ ग्राहक शाखा आणि ३३,००० पेक्षा जास्त विक्री केन्द्रे आहेत. यांतील ४९७ ग्रामीण भागात आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या दुसऱ्या तिमाहीत ०.८%चा ROA आणि ५.१%चा ROE व रु.626 कोटींचा करपूर्व नफा आणि रु. ४०८ कोटी [२] करोत्तर नफा नोंदवला.