Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
![]() |
बलजिंदर कौर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हरियाणवी, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ओळखळी जाते.[१][२] २०१४ मध्ये पगडी - द ऑनर ह्या हरियाणवी चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री मिळाला आहे. हरियाणवी भाषेतील चित्रपटासाठी या श्रेणीत पुरस्कार मिळवणारी ती एकमेव अभिनेत्री आहे.
कौरचा जन्म आणि बालपण पंजाबमधील भोगपूरजवळील भोंडियान गावात झाली. होशियारपूर येथील डीएव्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिला नाट्यशास्त्रात रस निर्माण झाला आणि १९९४ मध्ये तिने पंजाब विद्यापीठात इतर शिक्षणापेक्षा नाटकात पदवी घेण्याचा निर्णय घेतला. पदवी प्राप्त केल्यानंतर, तिने हरियाणातील हिसार येथील एका शाळेत नाटक शिकवण्यास सुरुवात केली. नंतर २००० मध्ये तिने ब्रिजेश शर्माशी लग्न केले, जो विद्यापीठात आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये दुसऱ्या कार्यकाळात तिचा वर्गमित्र होता.[१] नाट्य शाळेत असताना तिने शास्त्रीय नृत्य आणि संगीताचे विविध प्रकार शिकले आणि नंतर सहा वर्षे तिथे सदस्य म्हणून काम देखील केले.
कौरने चित्रपट अभिनेत्री म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला समीक्षकांनी प्रशंसित हिंदी चित्रपट शाहिद (२०१३) द्वारे सुरुवात केली. हा चित्रपट भारतीय वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते शाहिद आझमी यांच्या जीवनावर आधारित होते. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी कौरचा एक नाटक पाहिले होते. या प्रकल्पातील तिच्या भूमिकेसाठी तिला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि त्यानंतर आमिर खानच्या दोन चित्रपटांमध्ये, पीके (२०१४) आणि दंगल (२०१६) भूमिका करण्यासाठी तिला संपर्क साधण्यात आला, परंतु तिने ग्लॅमरस भूमिकांमध्ये काम करण्यास अनिच्छा दर्शविली आणि ही संधी नाकारली.[१]
२०१४ मध्ये, तिने राजीव भाटिया दिग्दर्शित हरियाणवी चित्रपट पगडी: द ऑनरमध्ये काम केले, ज्यांना ती ड्रामा स्कूलमध्ये असतानापासून ओळखत होती. तिचे पती ब्रिजेश शर्मा यांनीही या चित्रपटात नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी, तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर पंजाब विद्यापीठाने देखिल तिच्या कामासाठी तिला मान्यता दिली.[३][४][५] त्यानंतर सुधा कोंगारा प्रसाद यांच्या साला खडूस या द्विभाषिक चित्रपटात एका चेन्नईच्या झोपडपट्ट्यातील स्त्रीच्या भूमिकेत ती दिसली. तमिळ आवृत्तीतील तिच्या भूमिकेसाठी, तिने संवादांचे ध्वन्यात्मक इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर संवाद लक्षात ठेवले होते.[१]