बाबुलाल गौर सन १९५१ पर्यंत मजूर नेता झाले होते. त्यांच्या कामामुळे खुश झालेले जाॅर्ज फर्नांडिस बाबुलाल गौरांना भोपाळमध्ये येऊन भेटले, पण त्यांच्यापासून दूर राहून बाबुलाल अखिल भारतीय टेक्सटाईल लेबर युनियनचे उपाध्य्क्ष बनले. त्यानंतर १९६४मध्ये ते भारतीय मजदूर संघाचे संस्थापक सदस्य झाले.
त्याआधी सन १९४६पासून बाबुलाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जाऊ लागले होते. १९५६मध्ये संघाची टोपी घालून नागपूर स्टेशनच्या गेट नं. १ वर रेल्वेतून उतरलेल्या प्रवाश्यांना पाणी पाजताना त्यांना पंडित नेहरूंची पाहिले. ही टोपी 'तुम्हाला फार शोभून दिसते आहे' असा नेहरूंनी शेरा दिला.
४ जानेवारी १९७५ रोजी जयप्रकाश नारायण (जेपी) भोपाळमध्ये आले होते. बाबुलाल त्यांना रेल्वे स्टेशनवर जाऊन भेटले. पाच महिन्यांनंतर राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान बाबुलाल हे जेपींच्या सांगण्यावरून सरकारविरुद्धच्या एका 'धरण्या'मध्ये जाऊन बसले, आणि त्यांना अटक झाली. पण आणीबाणी संपल्यावर त्यांची सुटका झाली. जेपींनी त्यांना मध्य प्रदेश (म.प्र.)विधामसभेची १९७७ सालची निवडणूक लढविण्यास सांगितले. कुशाभाऊ ठाकरे यांची संमती मिळतात बाबुलाल गौर यांना दक्षिण भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला, आणि ते काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार लाडलीशरण सिन्हा यांना मोठ्या फरकाने हरवून मध्य प्रदेश विधानसभेत गेले. यापूर्वी १९५९मध्ये झालेल्या भोपाळ महापालिकेच्या निवडणुकीत याच लाडलीशरण सिन्हांनी बाबुलालांना ३८ मतांनी पराजित केले होते.
त्याआधी १९७४ साली बाबुलाल गौर हे एका पोटनिवडणुकीतून आमदार झाले होते. १९७७नंतर ते सतत नऊवेळा म.प्र. विधानसभेच्या निवडणुका जिंकत राहिले. १९९० साली सुंदरलाल पटवा सरकारमध्ये ते नागरी प्रशासन मंत्री झाले आणि २००४ साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
बाबुलाल गौर यांची समाजावर चांगली पकड होती आणि त्यावेळी
आणि विरोधी पक्षांतील लोकांशी दोस्ती होती.
इंदूरला त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी काही किरकोळ मागण्यांसाठी विमाने रोखून धरली. बाबुलाल गौर यांनी पोलिसांकडून बळाचा वापर करून हे बंड मोडून काढले. कार्यकर्त्यांवर कोर्टात मुकदमे दाखल केले. असे यापूर्वी कधी झाले नव्हते.
भोपाळ शहरातील सुखसोयींच्या आड येणारी बांधकामे निष्ठूरपणे बुलडोझर लावून पाडायला लावली. परिणामी लोक बाबुलालांना बुलडोझर मुख्यमंत्री म्हणू लागले. भोपाळमधील रस्त्यांचे रूंदीकरण.
पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासमोर बैठा सत्याग्रह करून भोपाळ गॅस कांडातील पीडित लोकांना परिसरातील बॅंंकांकडून २००-२०० रुपयांची अंतरिम मदत मिळवून दिली.
भोपाळमधील सिद्दीक हसन खानाच्या मशिदीची दुरुस्ती.
'बडा बागे'तील बावडीचे रूप बदलले. बडा बागेचे सौंदर्यीकरण.
हबीबगंज रेल्वे क्राॅसिंगच्या जागी अंडरब्रिज बनवला.
ऐशबाग स्टेडियममध्ये पाॅलिग्रास पसरवला.
भोपाळमधील धाकट्या तलावाच्या किनारी बगीचा बनवला.
त्या तलावात मानवी हस्तक्षेप होऊ नये म्हणून भोवताली जाळी बसवली.
नवाब सिद्दीक हसन तलावाच्या परिसरात होऊ घातलेल्या नव्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी नाकारली.
रस्त्याच्या कडेने झाडे लावली, रस्ता दुभाजक बसवले. ,,.वगैरे...