बारामती

  ?बारामती

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ०९′ ००″ N, ७४° ३४′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५३८ मी
जिल्हा पुणे
तालुका/के बारामती
लोकसंख्या ५१,३४२ (२००१)
नगराध्यक्ष
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३१०२
• +०२११२
• एम. एच. ४२
संकेतस्थळ: http://www.baramatidiary.com

बारामती हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. इतिहासात हे नगर "भीमथडी" या नावाने प्रसिद्ध होते.[ संदर्भ हवा ] कृषी हा बारामतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय असून ऊस, द्राक्षे व गहू ही येथील व्यापारी महत्त्वाची पिके आहेत. येथून मध्यपूर्वेत व युरोपात द्राक्षे व साखर निर्यात केली जाते. बारामतीला वैभवशाली अशी सामाजिक राजकीय व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे पूर्वीच्या भीमथडी म्हणून ओळखल्या गेलेल्या या शहराला आज एक वेगळा लौकिक प्राप्त झालेला आहे

इतिहास

[संपादन]

बारामती शहर कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. संदर्भ critical Analysis of the Social Movement in Baramati Taluka, Minor Research project submitted to UGC Dece2015 by Dr D.A. More pp. 1 शिवकाळात बारामती तालुक्यातील सूपे परगणातील समावेश होता.सूपे परगणाचे प्रमुख संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई या शहाजीराजे यांची पत्नी.सुपे ही शहाजी भोसले यांची सासरवाडी होती . आजही सूपे गावात इतिहासाच्या खुणा सापडतात. शरद पवार यांची जन्मभूमी काटेवाडी हे गाव बारामती जवळ आहे .बारामती तालुक्यात साखर कारखाने सहकारी व खाजगी तत्त्वावर चालणारे आहेत .बारामती मधील एम आय डी सीला चांगला नावलौकिक मिळालेला आहे .वेस्पा ही दुचाकी येथील प्रशिद्द गाडी आहे. मोठा संपूर्ण बारामती तालुक्याचा विकास राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे झालेला आहे. कृषी, उद्योग, शेती पूरक व्यवसाय, सहकारी संस्था यांचं संपूर्ण जाळं तालुक्यांमध्ये निर्माण केलेल आहे. बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून कविवर्य मोरोपंत सार्वजनिक वाचनालय चालवले जाते. या वाचनालयाचा लाभ बारामती शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण विद्यार्थी, महिला तसेच मुले घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुद्धा उपलब्ध आहे. बारामतीच्या भिगवण चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ग्रंथालयाचा सर्वांना लाभ मिळतो. याच ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये श्रीधर स्वामी सभागृह देखील आहे ज्या श्रीधर स्वामींनी बारामतीच्या करा नदी काठावर बसून शिवलीलामृत हा ग्रंथ लिहिला अशा या थोर पुरुषांची आठवण म्हणून या सभागृहाला त्यांचं नाव देण्यात आलेला आहे

भूगोल

[संपादन]

बारामती तालुका दुष्काळी प्रदेश आहे. येथे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु निरा डाव्या कालव्यामुळे बारामतीचा काही प्रदेश सिंचनाखाली आल्यामुळे तेथील शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बारामती शहराला पिण्याचे पाणी याच कालव्यामधून शुद्ध करून दिले जाते. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे येथील उन्हाळाही कडक असतो. हिवाळ्यामध्ये येथील वातावरण छान असते. क-हा नदीमुळे बारामती शहराचे दोन भाग पडतात ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वहात जाते.हि नदी सासवड मधून बारामतीकडे येते. पुण्यापासून बारामती तालुका 110कि. मि. अंतरावर आहे.नीरा नदीचे पाणी बारामती तालुक्यातील बरयाच गावांना शेतीसाठी उपयुक्त झाले आहे त्यामुळे नीरा नदी किनाऱ्यालगतचा शेती उद्दोग उत्तम चालतो. बारामती तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना शेती साठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जनाई शिरसाई उपसा शिंचन योजना माध्यमातून पाणी दिलेले आहे. आणि या भागात पाण्याची सोय करून दिलीली आहे.

अर्थव्यवस्था

[संपादन]

निरा डाव्या कालाव्याच्या सिंचनामुळे बारामती तालुक्यातील पूर्वेकडील भागाने शेती उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे. येथे मुख्यत्वे ऊस, गहू, मका इ.चे उत्पन्न घेतले जाते. काही ठिकाणी फळबागही आहेत. येथे पारंपारिक आणि आधुनिक या दोन्हीही प्रकारची शेती केली जाते. येथे ऊस पिकाचे भरघोस उत्पादन होत असून उसापासून साखर तयार करणारे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा भवानीनगर (इंदापूर) येथे स्थित असून बारामती आणि इंदापूर या दोन्ही तालुक्यातील उसाचे गाळप या कारखान्यात केले जाते. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा माळेगाव येथे स्थित असून येथे साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीही केली जाते. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर येथे स्थित आहे. या साखर कारखान्यांमुळे सभासद शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून त्यांचे राहणीमान उंचावले आहे. हे साखर कारखाने येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्याचबरोबर येथे भाजीपाला, फळे इ. चेही उत्पादन घेतले जाते. येथील भाजीपाला पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला जातो.

बारामतीचा पश्चिमेकडील भाग कमी पाऊस व सिंचनाच्या सोयीअभावी कोरडवाहू आहे. येथे फक्त पावसाळ्यात ज्वारी व बाजरीचे उत्पादन घेतले जाते. या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वाहन उद्योग, कापड उद्योग इ.चे कारखाने उभारण्यात आले आहेत. अलीकडे बारामतीचे औद्यौगिकीकरण झाल्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.तसेच शैक्शणिक संस्थामुळे देखिल अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतात.दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो .डायनामिक्स डेअरी व नंदन दुध प्रसिद्ध आहे .गोदरेज पशुखाद्य निर्मिती कारखाना येथे आहे . बारामतीमध्ये अजिंक्य बझार ,अजिंक्य बिग बझार,सिती मॉल, रिलायन्स मॉल, सुभद्रा मॉल यासारखे अनेक मॉल आहेत.या ठिकाणी बारामती जवळच्या अनेक गावातील लोक खेरिदीसाठी  येतात.

वाह्तुक व दळणवळण

[संपादन]

बारामती मध्ये दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. बारामती महाराष्ट्रातील इतर तालुके व जिल्हे यांना पक्क्या आणि रुंद रस्त्यांनी जोडलेली आहे. बारामती रेल्वे मार्गाने दौंड रेल्वे जंक्शनला जोडलेली आहे. दौंड रेल्वे जंक्शन उत्तर भारत व दक्षिण भारतातील मुख्य शहरांना रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. बारामती ते दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

बारामती मध्ये विमानतळ आहे. त्यामुळे बारामती देशातील मुख्य शहरांना हवाईमार्गाने जोडली जाऊ शकते. बारामतीचे विमानतळ आहे (बारामती विमानतळ), जेथे सध्या विमान चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. बारामती  विमानतळ हे देशातील भावी विमानतळांपैकी एक मानले  जाते, मोठ्या विमानांची सोय करण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढविली जात आहे. आतापर्यंत, छोटी विमाने व्

आणि हेलिकॉप्टर उतरण्यास हा विमानतळ सक्षम आहे. हा विमानतळ बारामतीपासून  सुमारे 8 कि.मी. अंतरावर आहे व  बारामती औद्योगिक क्षेत्राच्या (एमआयडीसी) भागात वसलेले आहे[].

बारामती पुणे प्रवास करण्यासाठी जलद बस सेवा (विना वाहक विना थांबा) दर अर्धा तास कालावधी मध्ये बस उपलब्ध आहेत त्यासाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध आहे.सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजे पर्यंत बस उपलब्ध आहेत. बारामती येथुन सातारा, कोल्हापूर, पुणे, सासवड , जेजुरी , जव्हार , ठाणे, सांगली, भूम , राशिन , जुन्नर, कर्जत, पंढरपूर ,मुंबई , तुळजापूर, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सोलापूर, रावेर, अश्या लांब पल्ल्याच्या गाडी दररोज सोडल्या जातात.

शिक्षण

[संपादन]

बारामती मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय अभिमत विद्यापीठ झाले आहे . , विद्यानगरी(विद्या प्रतिष्ठान) तसेच माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शारदाबाई पवार महिला महाविद्यालय Archived 2019-08-07 at the Wayback Machine. गव्हमेंट वैद्यकीय महविद्यालय ही पाच महत्त्वाची महाविद्यालये आहेत. विविध जिल्ह्यातील तसेच परराज्यातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यावयास येतात. शिक्षणाच्या बाबतीत व्यवस्थापन, अभियांत्रिकी, आरोग्य, संगणक आणि माहिती व तंत्रज्ञान, कायदा, मनुष्यबळ विकास, कृषी, शास्त्र, वित्तसहाय्य, ॲनिमेशन , कला, वाणिज्य, डिझायनिंग, पाकशास्त्र, मानव्यशास्त्र, मुक्‍त शिक्षण अभ्यासक्रम यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा सरकारी, खासगी, एनजीओ यांच्याद्वारे उपलब्ध आहेत.कृषक प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येथे प्रदर्शन पाहण्यासाठी येतात .शारदाबाई पवार कृषी महाविद्यालय शारदानगर येथे असून अत्यंत प्रसिद्ध आहे .विदयानागरी येथे बायोटेक्नॉलॉजी कॉलेज नामांकित आहे .तसेच येथील इंजिनीअरिंग कॉलेज सुद्धा नामांकित आहे. विद्या प्रतिष्ठान इंगजी आणि मराठी मध्यमाच्या शाळा सुद्धा प्रसिद्ध आहेत.पोतदार इंटरनॅेशनल स्कूल येथे आहे.

शहरात एम.ई .एस. (महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी)[]चे 100 वर्ष जुने  हायस्कूल आहे. स्वातंत्र्य सेनानी वासुदेव बळवंत फडके यांनी मार्च ३, १९११ रोजी स्थापन केलेल्या या शाळेने २०११ मध्ये १०० वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले. पाटस रस्त्याच्या मार्गावर श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनियर कॉलेज, बारामती येथे श्री. शरद पवार यांनी आठवी इयत्तेत एक वर्षासाठी (1954-55) शिक्षण घेतले. श्री छत्रपती शाहू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बारामती १९४४ मध्ये पद्भूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी शाहू बोर्डिंग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केले.

कृषी विकास प्रतिष्ठान, शारदानगर येथे मुलींसाठी समर्पित महाविद्यालय आहे. शारदानगर संकुलामध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, डे स्कूल, बेसिक ग्रॅज्युएशन, जुनियर कॉलेज, अ‍ॅग्री कॉलेज, बी.सी.ए, होम सायन्स, बी.व्होक.,औधोगिक प्रशिक्षण संस्था, शिक्षणशास्त्र महाविद्यालय इ.चा समावेश होतो.

के व्ही के ही शारदानगर येथे स्थित एक केंद्र सरकारची संस्था आहे, जी शेतकऱ्यांना शेती सुविधा व निदर्शने प्रदान करते. शारदानगरची  के. व्ही. के. प्रत्येक वर्षी कृषिक प्रदर्शनाचे आयोजन करते.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळ[], शिवनगरची स्थापना 1972 मध्ये ग्रामीण भागातील मुलांना  पूर्व-प्राथमिक[] ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केली गेली. हे प्रायोजित आहे मालेगाव सहकारी साखर कारखाना[] लि. शिवनगर, ता. बारामती जि. पुणे यांचे .  मा.श्री.शरदचंद्रजी पवार[] यांच्या दूरदृष्टी व गतिशील नेतृत्वात  येथील  शैक्षणिक संस्था चालवल्या जातात.  या  संकुलात  अभियांत्रिकी[][], फार्मसी [][१०] आणि व्यवस्थापन[११][१२] मध्ये व्यावसायिक उच्च शिक्षण दिले जाते .

प्रेक्षणीय  स्थळे

[संपादन]
  • कृषि विद्यान केंद्र कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी संशोधन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे ( शारदानगर )
  • विद्या प्रतिष्ठान वस्तु संग्रहालय
  • सिद्धेश्वर मंदिर - बारामती
  • काशीविश्वेश्वर मंदिर बारामती
  • पांढरीचा महादेव मंदिर बारामती
  • गणपती मंदिर सायली हिल् (एम.आय.डी.सी. बारामती)
  • माळावरची देवी मंदिर बारामती
  • पूनावाला गार्डन बारामती
  • श्री शिरसाई देवी (शिर्सुफळ)
  • श्री जानाई देवी (कटफळ)
  • मोरेश्वर मंदिर (मोरगाव)
  • स्वामी समर्थ मंदिर बारामती
  • श्री सोमनाथ मंदिर (करंजे सोमेश्वर)
  • हजरत चांदशाह वली बाबा (मुजावर वाडा)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Baramati". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-10-13.
  2. ^ "Bhaurao Patil". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-30.
  3. ^ "Shivnagar Vidya Prasarak Mandal". svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  4. ^ "SHIVNAGAR VIDYA PRASARAK MANDAL'S ENGLISH MEDIUM SCHOOL, MALEGAON (BK)". ems.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  5. ^ "दि. माळेगाव सहकारी साखर कारखाना". www.malegaonsugar.com. 2020-01-25 रोजी पाहिले.
  6. ^ "Sharad Pawar". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-18.
  7. ^ "College Of Engineering, Malegaon (Bk)". engg.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  8. ^ "Institute of Technology And Engineering Malegaon (Bk)". ite.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  9. ^ "College of Pharmacy, Malegaon (Bk)". pharmacy.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  10. ^ "Institute of Pharmacy, Malegaon (Bk)". iop.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  11. ^ "The Institute of Management, Malegaon". mgmt.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  12. ^ "College of Commerce Science And Computer Education, Malegaon (Bk)". ccsce.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.