बाळ धुरी (१९४४ - हयात)[१] हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते आहेत. त्यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील चित्रपटात काम केले आहे. चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर या त्यांच्या पत्नी आहेत. मराठी चित्रपटांमधील त्यांच्या अनेक भूमिकांसाठी आणि रामानंद सागर यांच्या टीव्ही मालिका, रामायण मालिकेत त्यांनी दशरथ राजाची, तर त्यांच्या पत्नी जयश्रीने राणी कौसल्या यांची भूमिका केली होती. तेरे मेरे सपने १९९६ या चित्रपटात चंद्रचूड सिंग यांच्या सचिव म्हणून काम केले होते.[२]
धुरी यांचे खरे नाव भैय्युजी असे होते. त्यांना चार भावंडे असून त्यानंतर हे घरातील सर्वात लहान असल्याने त्यांना बाळ असे संबोधले जात असे. शेवटी हेच टोपण नाव कायम झाले. धुरी यांनी मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातून वस्त्र अभियांत्रिकी (टेक्सटाइल इंजिनिअरिंग) शिक्षण घेतले होते. प्रारंभी त्यांनी नोकरी देखील केली होती.[३] 'पिरामल' गिरणीत त्यांनी नोकरी सुरू केली. तेथे आंतरगिरणी स्पर्धेत त्यांनी मराठी नाटक ‘काचेचा चंद्र’ मध्ये काम केले. अभिनेत्री उषा नाडकर्णी या देखील त्यांच्यासोबत या नाटकात होत्या. सदरील स्पर्धेत त्यांच्या नाटकाचा पहिला क्रमांक तर आलाच, सोबत त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक देखील मिळाले. मराठी, हिंदी, गुजराती, मारवाडी अशा विविध भाषांतील सत्तर चित्रपटांतूनही त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. याच सोबत तीस-पस्तीस नाटकां मध्ये त्यांनी काम केले असून एकूण नाटकांचे प्रयोग साडेपाच हजारांहून अधिक झाले आहेत. त्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि काही टेलिफिल्ममध्ये देखील काम केले आहे.[४]
१९७५ साली जयश्री गडकर सोबत त्यांचे लग्न झाले. गडकर या पूर्वीपासूनच मराठी चित्रपसृष्टीत बालकलाकार म्हणून काम करत होत्या. त्यामुळे लग्नानंतर देखील त्यांनी जोडीने विविध चित्रपटात काम केले.[३]
संगीत वरद या संगीत नाटकात ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना सहभागी करून घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.[५]
वर्ष | चित्रपट | भूमिका | प्रकार | भाषा |
---|---|---|---|---|
देवाचीये द्वारी | चित्रपट | मराठी | ||
पाहुणी | चित्रपट | मराठी | ||
राजा पंढरीचा[६] | चित्रपट | मराठी | ||
सासर माहेर | चित्रपट | मराठी | ||
१९७६ | जय बजरंग बली | चित्रपट | हिंदी | |
१९८१ | सून माझी लक्ष्मी | चित्रपट | मराठी | |
१९८६ | रामायण | दशरथ | दूरचित्रवाणी मालिका | हिंदी |
१९८८ | पंढरीची वारी | चित्रपट | मराठी | |
१९८९ | ईश्वर | चित्रपट | हिंदी | |
सत्यवादी राजा हरिश्चंद्र[७] | चित्रपट | गुजराती | ||
१९९० | सौतन की बेटी | चित्रपट | हिंदी | |
दरोडेखोर | चित्रपट | मराठी | ||
१९९१ | मुंबई ते मॉरिशस | चित्रपट | मराठी | |
१९९४ | द ग्रेट मराठा | बाळाजी बाजीराव पेशवे | दूरचित्रवाणी मालिका | हिंदी |
१९९६ | तेरे मेरे सपने | रामसिंग | चित्रपट | हिंदी |
२००० | अशी असावी सासू | चित्रपट | मराठी | |
चिमणी पाखरं | बापूसाहेब | चित्रपट | मराठी | |
२००६ | हिरवं कुंकू | चित्रपट | मराठी | |
२००७ | बंध प्रेमाचे | चित्रपट | मराठी | |
तिघी | चित्रपट | मराठी | ||
माहेर माझे हे पंढरपूर [८] | चित्रपट | मराठी | ||
२००८ | अशी ही भाऊबीज | चित्रपट | मराठी | |
२०१० | खुर्ची सम्राट | चित्रपट | मराठी | |
२०११ | सदरक्षणाय | वसंत पंडित | चित्रपट | मराठी |