चित्र:Balkrishna Tyres Logo २०२४.svg | |
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
शेअर बाजारातील नाव |
बी.एस.ई.: 502355 एन.एस.ई.: BALKRISIND |
उद्योग क्षेत्र | Auto and Truck parts |
स्थापना | १९८७ [१] |
मुख्यालय | मुंबई, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | जगभर |
उत्पादने | टायर्स |
महसूली उत्पन्न |
![]() ![]() |
निव्वळ उत्पन्न |
![]() ![]() |
कर्मचारी | ६,००० |
संकेतस्थळ |
www |
बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड ( बीकेटी ) ही मुंबई, भारत येथील टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज विशेष विभागांत वापरले जाणारे टायर बनवतात उदा खाणीत काम करणारी वाहने, जमीन खोदणारी यंत्रे, शेती आणि बागकाम. या कंपनीचे पाच कारखाने औरंगाबाद, भिवंडी, चोपांकी, डोंबिवली आणि भूज येथे आहेत. स.न. २०१३ मध्ये, जगातील टायर उत्पादकांमध्ये हे ४१ व्या स्थानावर होते. [४]
बाळकृष्ण इंडस्ट्रीज सध्या जेसीबी, जॉन डीरे आणि सीएनएच इंडस्ट्रियलसारख्या अवजड उपकरण उत्पादकांसाठी एक OEM विक्रेता आहे. या कंपनीचा सध्या ग्लोबल ऑफ-द-रोड टायर सेगमेंटमध्ये २% मार्केट शेअर आहे. [५]
बाळकृष्ण इंडस्ट्रीज मुख्यत: उत्तर अमेरिका आणि युरोपमधील बदली बाजारात आहे. त्यांचे उत्तर अमेरिकन कार्यालय अक्रॉन येथे आहे. व्हेन्डो, दक्षिण कॅरोलिना येथे एक गोदाम आहे. [६] अमेरिकेतील बाळकृष्ण इंडस्ट्रीजचा जवळपास ८५ टक्के व्यवसाय शेतीशी निगडीत आहे. [७]
बीकेटी टायर्स २०१४ पासून मॉन्स्टर जॅमसाठी अधिकृत आणि विशेष टायर प्रायोजक आहेत. [८] जुलै २०१८ मध्ये, बीकेटीने करारानुसार लीगला सेरी बीकेटी म्हणून ओळखले जाणारे तीन वर्षांसाठी इटालियन फुटबॉलच्या दुसऱ्या विभागातील सेरी बीचे नामकरण अधिकार खरेदी केले. [९]