बिहू नृत्य हे आसाम राज्यातील प्रमुख लोकनृत्य आहे.[१] आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेल्या बिहू उत्सवांच्या काळात हे नृत्य केले जाते.रोंगाली बिहू, काटी बिहू, माघ बिहू या उत्सवांच्या काळात बिहू नृत्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.[२]
एका गटात सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यामध्ये बिहू नर्तक सहसा तरुण पुरुष आणि स्त्रिया असतात. ही नृत्य शैली वेगवान पावले आणि वेगवान हाताच्या हालचालींद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. नर्तकांचा पारंपारिक पोशाख रंगीबेरंगी असतो आणि लाल रंगाभोवती केंद्रित असतो, जो आनंद आणि उत्साह दर्शवतो.[३][४]
या नृत्य प्रकाराची उत्पत्ती अज्ञात आहे, तथापि लोकनृत्य परंपरा आसाममधील कैवर्तास, देवरी, सोनोवाल कचारी, चुटिया, बोरोस, मिसिंग्स, राभास, मोरान आणि बोराहिस यांसारख्या विविध वांशिक गटांच्या संस्कृतीत नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली आहे. विद्वानांच्या मते, बिहू नृत्याचा उगम प्राचीन प्रजनन पंथांमध्ये आहे जो लोकसंख्येच्या तसेच जमिनीची सुपीकता वाढवण्याशी संबंधित होता.[५][६]
पारंपारिकपणे, स्थानिक शेतकरी समुदाय घराबाहेर, शेतात, चरांमध्ये, जंगलात किंवा नद्यांच्या काठावर, विशेषतः अंजिराच्या झाडाखाली नृत्य सादर करतात.[७] आसाममधील तेजपूर आणि दरांग जिल्ह्यात सापडलेल्या ९ व्या शतकातील शिल्पांमध्ये बिहू नृत्याचे सर्वात जुने चित्रण आढळते. १४ व्या शतकातील चुटिया राजा लक्ष्मीनारायण यांच्या शिलालेखांमध्येही बिहूचा उल्लेख आहे.
या नृत्यात प्रामुख्याने युवक आणि युवती सहभागी होतात. या नृत्याला बिहू लोकगीतांची जोड दिलेली असते आणि त्यातून प्रेमभावनेचा आशय व्यक्त केला जातो.दैनंदिन आयुष्य, नवीन वर्ष यांच्याशी समबंधीत गीतेही गायली जातात. [८] हा नृत्यप्रकार पुरुषप्रधान असून गीतांचे गायन मात्र स्त्रिया करतात. हे नृत्य जलद गतीने आणि चपळाईने केले जाते तसेच कमरेच्या हालचाली यात विशेषत्वाने केल्या जातात.[९] या नृत्या चेहरा-या वरील हावभाव हेही महत्त्वाचे मानले जातात. [८] रोंगाली बिहू हा सर्जन शक्तीचा उत्सव मानला गेला आहे, त्यामुळे त्यादरम्यान केल्या जाणा-या नृत्यात ज्ञानेंद्रिये सुखावणा-या अशा काही हालचालींचा समावेश असतो.[१०]
आग्नेय आशिया आणि चीन मधील "ताई" नृत्यप्रकाराशी या नृत्याचे साधर्म्य असल्याचे काही अभ्यासक नोंदवतात.[११]
उत्सवादरम्यान मोकळी शेते, व्यासपीठे वा झाडांच्या रायांमध्ये हे नृत्य सादर केले जाते आणि आनंद घेतला जातो. [८] मासिक धर्माच्या काळात महिलांनी या नृत्यास उपस्थित राहू नये अशीही एक समजूत प्रचलित आहे.[१२]
गारो बिहू आणि खासी बिहू असे याचे दोन प्रकार आहेत.[९]
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)