बास संगीत या प्रकाराला यूके बास किंवा पोस्ट-डबस्टेप देखील म्हणले जाते.[१][२] बास संगीत हे एक प्रकारचे क्लब संगीत आहे. २००० च्या दशकाच्या मध्यात युनायटेड किंग्डममध्ये हा प्रकार प्रचलित झाला. या संगीतावर डबस्टेप, यूके गॅरेज, आर अँड बी, वोंकी, हाउस आणि ग्रीम यासारख्या विविध संगीत शैल्यांच्या प्रभाव आहे.[३] "बास संगीत" हा शब्दप्रयोग वापरला कारण कलाकारांनी या शैलींचे ध्वनीचा संमिश्रपणे वापर सुरू केला.[४]