बेहराम कॉन्ट्रॅक्टर तथा बिझीबी (१९३० - ९ एप्रिल, २००१), हे एक भारतीय पत्रकार, विनोदकार आणि १९८५ ते २०१९ दरम्यान मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या 'द आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरिअर' या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक होते.
कॉन्ट्रॅक्टरने फ्री प्रेस जर्नल, द टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई), आणि मिड-डे येथे काम केले. त्यांनी त्यांचा विशिष्ट पारशी [१] वारसा, चालीरीती आणि खाद्यपदार्थ याबद्दल विपुल लेखन केले. [२]
१९८५ मध्ये त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र द आफ्टरनून डिस्पॅच आणि कुरियर तथाआफ्टरनून सुरू केले.
स्वतःच्या वृत्तपत्राचे संपादक असतानाही कॉन्ट्रॅक्टरनी टाइम्स ऑफ इंडिया आणि मिडडेसाठी बिझीबी या टोपण नावाने लेख लिहिणे सुरू ठेवले आणि राऊंड आणि अबाउट हा स्तंभ लिहिला.
कॉन्ट्रॅक्टरनी "ईटिंग आऊट" ही मुंबईतील रेस्टॉरंट आणि खाद्यसंस्कृतीबद्दलची मालिका देखील लिहिली.
त्यांना १९९० मध्ये पद्मश्री, [३] आणि १९९६ मध्ये पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी गोयंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९८५मध्ये, त्यांनी फरझाना कॉन्ट्रॅक्टरशी लग्न केले. त्या देखील एक पत्रकार होत्या. [४]
बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांचे २००१ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.