"With 2,245 MW of Commissioned Solar Projects, World's Largest Solar Park is Now at Bhadl". 20 March 2020 रोजी पाहिले.</ref>
Bhadla Solar Park | |
---|---|
<mapframe>: Attribute "width" चे मूल्य अवैध आहे | |
देश | भारत |
स्थान | भादला, फलोदी तालुका, जोधपूर जिल्हा, राजस्थान, भारत |
समन्वयक | 27°32′23″N 71°54′55″E / 27.5396685°N 71.9152528°E |
स्थिती | Operational |
सुरु झाल्याची तारीख | २० मार्च २०२० |
Geothermal power station | |
Nuclear power station | |
Solar farm | |
Type | Flat-panel PV |
Thermal power station | |
Tidal power station | |
Wave power station | |
Wind farm | |
_BLANK_ | |
Site area | ५,७०० हेक्टर (१४,००० एकर) |
Power generation | |
लेखन त्रुटी:"Infobox power station" असा कोणताच विभाग नाही. | |
Nameplate capacity | २,२४५ मेगावॅट[१][२][३] |
External links | |
Commons | Related media on Commons |
साचा:EditOnWikidata |
भादला सौर पार्क हा २०२० पर्यंतचा जगातील सर्वात मोठा सौर पार्क आहे. हा प्रकल्प भादला, फलोदी तालुका, जोधपूर जिल्हा, राजस्थान, भारत येथे ५,७०० हेक्टर (१४,००० एकर) क्षेत्रामध्ये पसरलेला आहे.चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला. २०२० च्या डिसेंबरपर्यंत सौरऊर्जेसाठी सर्वात कमी खर्च २.४४ (US$०.०५) प्रति किलोवॅट-तास [४][५] इतका आला होता. सप्टेंबर २०१८ मध्ये, ॲक्मे सोलरने घोषित केले की भारताची सर्वात स्वस्त सौर उर्जा तयार करणारा प्रकल्प आहे.[६]
भादला येथील वातावरण वालुकामय, रुक्ष आणि कोरडे आहे. याचे एकूण क्षेत्र ४५ चौरस किमी (१७ चौ. मैल) आहे. भादला जोधपूरच्या सुमारे २०० किलोमीटर (१२० मैल) उत्तरेकडे आणि सुमारे ३२० किलोमीटर (२०० मैल) जयपूरच्या पश्चिमेस आहे. येथील हवामानामुळे हा प्रदेश राहण्यास योग्य नाही. भादला मधील सरासरी तापमान ४६–४८ °से (११५–११८ °फॅ) असते. येथे भरपूर वारा आणि वाळूची वादळे देखील खूप असतात. भादला येथून सर्वात जवळचे गाव ५० किलोमीटर (३१ मैल) दूर आहे. सर्वात जवळील शहर फलोदी तालुक्याचे ठिकाण आहे जे ८० किलोमीटर (५० मैल) अंतरावर आहे.[७]
पहिल्या टप्प्यात एनटीपीसी लिमिटेडने तयार होणारी ४२० मेगावॅटची क्षमतेचा लिलाव केला. ही क्षमता ६ भागांमध्ये विभागली गेली प्रत्येकी ७० मेगावॅटचा एक भाग या प्रमाणे. फिन्निश कंपनी फोर्टमने सर्वात कमी दर ४.३४ प्रती किलोवॅट असे कोट केले होते. राइजिंग सन एनर्जी आणि सोलॅरेडायरेक्टने २ भाग जिंकले, त्यांचे कोट प्रत्येकी ४.३५ प्रती किलोवॅट होते. यारो इन्फ्रास्ट्रक्चरने बाकीचे भाग जिंकले ज्याचे मूल्य ४.३६ प्रती किलोवॅट होते.[८][९]
डिसेंबर २०१६ मध्ये, सोलॅइडीरेक्टने या प्रोजेक्टला स्वयंचलित स्वच्छता यंत्रणेच्या समाधानासाठी इकोपिया या पीव्ही पॅनेल क्लीनिंग सोल्यूशन डेव्हलपरसह करारावर स्वाक्षरी केली. येथील वाळवंटातील वातावरणामुळे येथे धुळीचा फार त्रास आहे.[१०] सोलॅइडीरेक्टने फेब्रुवारी २०१७ मध्ये आयडीबीआय बँकेकडून 6.75 अब्ज (US$१४९.८५ दशलक्ष) कर्ज घेतले होते [११]
सौर ऊर्जा निगम (एसईसीआय) ने २५० मेगवॅट क्षमतेचा लिलाव दुसऱ्या टप्प्यात केला. यासाठी २७ कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या.[१२]
११ मे २०१७ रोजी सौर ऊर्जा निगमने (एसईसीआय) तिसऱ्या टप्प्यात १००० मेगावॅट क्षमतेचा लिलाव केला.[५]
एसईसीआयने ८०० मेगावॅट २.४४ (US$०.०५) प्रति किलोवॅट-तास या दराने विकली. सप्टेंबर २०१८ मध्ये सॉफ्टबँक समूहाला ५०० मेगावॅट आणि एसीएमईला २०० मेगावॅट देण्यात आले. नोव्हेंबर २०१९ मध्ये एचएफईने १०० मेगावॅटचे उत्पादन सुरू केले. जानेवारी २०२० पर्यंत २०० मेगावॅट क्षमतेचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.[५]
१९ मे २०१७ रोजी सौर ऊर्जा निगमने (एसईसीआय) चौथ्या टप्प्यात २५० मेगावॅट क्षमतेचा लिलाव केला.[५]
दक्षिण आफ्रिकेच्या फेलन एनर्जी ग्रुप आणि अवाडा पॉवर यांना अनुक्रमे ५० मेगावॅट आणि १०० मेगावॅट क्षमता देण्यात आली. २.६२ प्रती किलोवॅटची बोली लावली गेली. ही भारतातील कोणत्याही सौर उर्जा प्रकल्पासाठीचा सर्वात कमी दर आहे. ही किंमत एनटीपीसीच्या कोळशाचा वीज दर३.२० सरासरी प्रती किलोवॅट-तासाच्या पेक्षाही कमी होती. एअरटेल आणि फॉक्सकॉनच्या सॉफ्टबँक समूहाचे एसबीजी क्लीनटेक यांना उर्वरित १०० मेगावॅट देण्यातआली, यासाठी २.६३ प्रती किलोवॅट-तास हा दर ठरवण्यात आला.[१३]
२२ फेब्रुवारी २०१७ रोजी एनटीपीसीने घोषित केले की त्यांनी ११५ मेगावॅट क्षमतेचे उत्पादन सुरू केले आहे.[१४] या व्यतिरिक्त ४५ मेगावॅट [१५][१६] ८ मार्चला आणि २५ मेगावॅट क्षमतेची सुरुवात १८ मार्च रोजी होईल [१७] एनटीपीसीने २० मेगावॅट 23 मार्च रोजी [१८][१९] आणि ५५ मेगावॅट २५ मार्च २०१७ रोजी [२०][२१] सुरू करण्याचे जाहीर केले. भादला पार्कची एकूण क्षमता २६० मेगावॅट पर्यंत नेली.[२२] सप्टेंबर २०१८ मध्ये १३६५ मेगावॅट उत्पादनाला सुरुवात झाली होती.
त्याची संपूर्ण क्षमता कार्यरत झाल्यानंतर, पार्क जगातील सर्वात मोठा पूर्णपणे चालू केलेला पीव्ही प्रकल्प बनला आहे. यात २,२४५ मेगावॉट [२३] इतके उत्पादन होते आणि यासाठी १०० billion (US$२.२२ अब्ज) गुंतवणूक केली गेली.
<ref>
चुकीचा कोड; p
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे