हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सदर ग्रंथ हा ज्योतिषशास्त्र विषयावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. महर्षी भृगू हे याचे कर्ते आहेत.[१]
भृगू हे एक वैदिक ऋषी असून त्यांचे आयुर्मान १०,००० वर्षे होते अशी आख्यायिका प्रचलित आहे.महाभारत ग्रंथात ही त्यांचा उल्लेख सापडतो. परंतु हे एक वांशिक नावही असल्याने नेमक्या भृगू नावाच्या कोणत्या व्यक्तीने या विशिष्ट ग्रंथाची रचना केली हे समजू शकत नाही. याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही.[२]
नवग्रहांचा प्रभाव तसेच फलित ज्योतिष हे या ग्रंथात मांडले गेलेले विषय आहेत.[३]
भारतीय किंवा हिंदू ज्योतिषशास्त्र विषयातील ग्रंथांपेक्षा या ग्रंथाचे वेगळेपण असे मानले जाते की या ग्रंथात महर्षी भृगू यांनी प्रत्येक व्यक्तीचे भूतकालीन,वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन असे तिन्ही काळातील जीवन चित्रण केलेले आहे.[४]