मंडपेश्वर लेणी ही मुंबईतील बोरीवली येथील लेणी आहेत. या लेण्यांना मंगलस्थान किंवा मागठाण असेही संबोधिले जाते.[१]
ही शैव संप्रदायाची ब्राह्मणी लेणी असून इसवी सनाच्या सहाव्या शतकात निर्माण झाली आहेत.[१]
या लेण्यांच्या सुरुवातीला शिव तांडव नृत्य करतानाचे शिल्प अंकित करण्यात आले आहे.[१]
इसवी सनाच्या सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती. या लेण्यांचे परकीय आक्रमणाच्या प्रयत्नात नुकसान झाले असे नोंदविलेले दिसते.[२][१]