मंदाकिनी आमटे किंवा मंदा आमटे या महाराष्ट्रातील एक डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.[१] प्रसिद्ध समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांच्या त्या पत्नी तर बाबा आमटे यांच्या सून आहेत.[१][२][३][४] महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील तसेच आंध्र प्रदेश व मध्यप्रदेश राज्यातील माडिया गोंड आदिवासी समाजासाठी लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात परोपकारी कार्य केल्याबद्दल त्यांना २००८ मध्ये त्यांचे पती प्रकाश आमटे यांच्यासोबत 'कम्युनिटी लीडरशिप' [५] साठी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१]
आमटे यांचा जन्म मंदाकिनी देशपांडे म्हणून झाला. त्यांनी नागपूर येथून आपले एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले होते [१] त्यानंतर नंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) भुलतज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरवले. [१] प्रकाश आमटे हे त्यावेळी एक सर्जन असल्याने त्यांची भेट झाली. त्यांनी एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये एकत्र काम केले.
त्यांच्या वडिलांचा प्रकाश आमटेसोबतच्या लग्नाला विरोध होता कारण त्यांना भीती होती की तिला कुष्ठरोग्यांमध्ये राहावे लागेल, जे तेव्हा गंभीर बाब आणि एक मोठे अवघड काम मानले जात होते. [६][७]
आमटे आणि त्यांचे पती यांना २००८ साठी सामुदायिक नेतृत्वासाठी संयुक्तपणे मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, [१]त्यांचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे:[८] [९]
मोनॅकोच्या प्रिन्सिपॅलिटीने १९९५ मध्ये प्रकाश मंदाकिनी यांच्या जीवन आणि कार्याच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट काढले - जसे त्यांनी १९५५ मध्ये अल्बर्ट श्वेट्झरसाठी केले होते. मोनॅकोच्या राज्याने परदेशी व्यक्तीला त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी सन्मानित करण्यासाठी स्टॅम्प काढण्याची ही दुसरी वेळ होती.
एक फ्रेंच जोडपे, गाय आणि ग्रीट बार्थेलेमी, ज्यांनी पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला श्वेत्झरसोबत काम केले होते, त्यांनी १९९२ मध्ये हेमलकसा येथील या प्रकल्पाला भेट दिली. हेमलकसा आणि आफ्रिकेतील ज्या ठिकाणी श्वेत्झर काम करत होते तेथील परिस्थितीतील साम्य पाहून ते प्रेरित झाले. या फ्रेंच जोडप्याने माघारी जाऊन मोनॅकोचा प्रिन्स रेनियर तिसरा यांना आमटेसचा सन्मान करण्यासाठी टपाल तिकीट प्रकाशित करण्याचे आवाहन केले. हे तिकीट १९९५ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते.[१०][११]