मदुराई कामराज विद्यापीठ

मदुरै कामराज विद्यापीठ (तमिळ: மதுரை காமராஜர் பல்கலைக்கழகம் ; उच्चार: मदुरै कामराजर् पलकलैकळहम) हे तमिळनाडूमधील एक विद्यापीठ आहे.

इतिहास

[संपादन]

मदुराई कामराज विद्यापीठाचे उद्घाटन ६ फेब्रुवारी १९६६ रोजी करण्यात आले.हे मद्रास विद्यापीठाचे एक विस्तारीत केंद्र होते.१९६८ मध्ये तेंव्हाचे भारताचे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांनी नवीन परिसराची कोनशिला स्थापन केली. १९७१ मध्ये या विद्यापीठामध्ये दूरस्थ शिक्षण संचालनालयाची स्थापना झाली.मद्रास राज्याचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांना सन्मानित करण्यासाठी १९७८ मध्ये याचे नाव मदुराई कामराज विद्यापीठ असे बदलण्यात आले.