मनोहर लाल खट्टर | |
विद्यमान | |
पदग्रहण २६ ऑक्टोबर २०१४ | |
राज्यपाल | कप्तान सिंग सोळंकी |
---|---|
मागील | भूपिंदरसिंग हूडा |
मतदारसंघ | कर्नाल |
जन्म | ५ मे, १९५४ निंदन गाव, रोहतक जिल्हा, हरियाणा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
धर्म | हिंदू |
मनोहरलाल खट्टर (जन्म: ५ मे १९५४, निदाना, रोहतक) हे भारताच्या भारतीय जनता पक्षाचे नेते व हरियाणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत. ऑक्टोबर २०१४ मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पक्षाच्या विधिमंडळ बैठकीमध्ये खट्टर ह्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. ते २६ ऑक्टोबर २०१४ रोजी पदाची शपथ घेऊन हरियाणामधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनतील.
१९७७ साली खट्टर ह्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला व पुढील १४ वर्षे संघाच्या प्रचारकाचे काम केले. १९९४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २००२ ते २०१४ या काळात त्यांनी हरियाणा भाजपाचे संघटनात्मक सरचिटणीस म्हणून काम पाहिले. मनोहरलाल खट्टर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत हरियाणा भाजपा निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.