महात्मा गांधी पूल पाटणा ते हाजीपूरला जोडण्यासाठी गंगा नदी वर उत्तर-दक्षिण या दिशेला बांधण्यात आलेला एक पूल आहे. हा जगातील सर्वात मोठा, एकाच नदीवर बांधण्यात आलेला पूल आहे. याची लांबी ५,५७५ मीटर आहे. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यानी या पुलाचे उदघाटन मे १९८२ मध्ये केले होते.
या पुलाची निर्मिती गॅमन इंडिया लिमिटेड यांनी केली आहे. आज हा पूल राष्ट्रीय महामार्ग १९ भाग आहे.