महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल हा भारताच्या पश्चिम भागातील महाराष्ट्र राज्याचा भूगोल होय.महाराष्ट्र हे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी भूमी आहे.महाराष्ट्रास पश्चिमेस 720 कि. मि. लांबीचा विस्तीर्ण अरबी समुद्र किनारा आहे.प्रशासकीय दृष्टीने महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्ह्यामध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देशातील सर्व राज्य होते. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असून एक मे 2010 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे.महाराष्ट्राची दक्षिणात्तर लांबी 720 किलोमीटर असून पूर्व पश्चिम लांबी 800किलोमीटर आहे.

प्राकृतिक विभाग

[संपादन]

१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश

२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा ;उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा

३. महाराष्ट्राचे पठार

महाराष्ट्रातील जलप्रणाली

[संपादन]

पश्चिम वाहिनी नद्या

[संपादन]

१. तापी-पूर्णा नदी प्रणाली

२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.

3. नर्मदा नदी.

पूर्व वाहिनी नद्या

[संपादन]

१. प्राणहिता नदी प्रणाली

२. गोदावरी नदी प्रणाली

३. कृष्णा नदी प्रणाली

४. भीमा नदी प्रणाली

हवामान

[संपादन]

महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. (१) नैऋत्य मोसमी हवामान (२) ईशान्य मोसमी हवामान

महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक

[संपादन]

१. भौगोलिक स्थान

२. अक्षवृत्तीय विस्तार

३. मोसमी वारे

४. सागरी सान्निध्य

५. प्राकृतिक रचना

मृदा

[संपादन]

१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)

२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)

३. खोल काळी मृदा

४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा

५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा

६. पिवळसर तपकिरी मृदा

७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा

८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन

वनस्पती

[संपादन]

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:

१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती

३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

४. आर्द्र-पानझडी वनस्पती

५. शुष्क पानझडी वनस्पती

६. रूक्ष काटेरी वनस्पती

७. खाजण वनस्पती