मायकेल गोरा (१७ फेब्रुवारी, इ.स. १९५७) हे एक अमेरिकन लेखक व इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक आहेत. ते अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स राज्यातल्या नॉर्दॅम्पटन शहरातल्या स्मिथ कॉलेजात शिकवतात. त्यांनी लिहीलेले पोर्ट्रेट ऑफ अ नॉव्हेल हे हेन्री जेम्सचे २०१२ मध्ये प्रकाशित चरित्र प्रसिद्ध आहे. याशिवाय गोरा यांनी भारतातल्या प्रवासाचे वर्णन आफ्टर एम्पायर या नावाखाली लिहीलेले आहे (प्रकाशन १९९७). त्यांनी जर्मनीतील प्रवासचे वर्णन द बेल्स इन देर सायलेन्स लिहिले आहे (प्रकाशन २००४). गोरांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध नाहीत.