मार्को यान्सिन (१ मे, २०००:दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. २०२१ च्या आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध ९ एप्रिल २०२१ रोजी आयपीएल पदार्पण केले.
२६ डिसेंबर २०२१ रोजी सेंच्युरियन येथे भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याने कसोटी पदार्पण केले.