मुंबई मेट्रो मार्गिका १० (हिरवी मार्गिका) | |
---|---|
मालकी हक्क | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण |
स्थान | मुंबई आणि ठाणे , महाराष्ट्र, भारत |
वाहतूक प्रकार | मेट्रो |
मार्ग | उन्नत |
मार्ग लांबी | ९.२ किमी कि.मी. |
एकुण स्थानके | ४ |
मुख्यालय | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
मार्गिका १० (मुंबई मेट्रो) ही हिरव्या मार्गिकेचा विस्तारित भाग असून , याला गायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गिका म्हणून संबोधले जाते. ही भारताच्या महाराष्ट्रातील मुंबई शहरातल्या मेट्रो प्रणालीचा एक भाग आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घोषित केले की दिली मेट्रो रेल्वे महामंडळ (डीएमआरसी) मेट्रो १०चा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करीत आहे. एमएमआरडीए आणि डीएमआरसी यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या प्राथमिक योजनेप्रमाणे ही ठाणे - भाईंदर महामार्गाला समांतर मार्गाने धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मेट्रो मार्गिका ९ शी जोडले जाईल. या प्रकल्पाची किंमत ₹३,६०० कोटी (यूएस $ ५३ कोटी) आहे. [१] [२] [३]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ सप्टेंबर रोजी मुंबई मेट्रो १० च्या ९.२ किमी लांबीच्या गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गिकेचा शिलान्यास केले. २०२२ मध्ये या मार्गिकेचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा असून मीरा-भाईंदर, ठाणे, बोरिवली आणि उर्वरित मुंबईमला ही मार्गिका जोडेल. या मार्गिके मुळे रस्त्याच्या परिस्थितीनुसार सध्याच्या तुलनेत प्रवासासाठी ५०% ते ७५% पर्यंत कमी वेळ लागेल.
महाराष्ट्र सरकार डीएमआरसीने शिफारस केलेले मास्टर प्लॅन मार्गिका द्रुतगतीने कार्यान्वित करण्यासाठी व पुढील 3-4 ते वर्षात पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे. सर्वप्रथम, प्रकल्प अहवाल अद्ययावत करण्याचे व पुढील संभाव्य उन्नत मेट्रो मार्गिकेसाठी नवीन प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
१. मापक (नाममात्र) :: - १४३५ मिमी
2 मार्गाची लांबी :: -
# | विस्ताराचे नाव | उन्नत (किमी) | भूमिगत (किमी) | भूपातळीवर (किमी) | एकूण लांबी (किमी) |
---|---|---|---|---|---|
1 | गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) | ८.४१४ किमी | ०.६८ किमी | ०.११५ किमी | ९.२०९ किमी |
3 स्थानकांची संख्या :: - ४ (सर्व उन्नत)
4 रहदारी अंदाज: : - गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) पर्यंत
वर्ष | दैनिक वापरकर्ते |
---|---|
२०२१ | २,६४,१८८ |
२०३१ | ४,६६,५५१ |
5. गती ९० किमी / ता
ii. कमाल वेग ८० किमी / ता
iii. वेळापत्रक गती ३५ किमी / ता
६. मार्गान्त : - हे गायमुख-सीएसएमटी मेट्रो मार्गिकेचे गायमुखकडील विस्तारआहे. खाली नमूद केल्याप्रमाणे या विभागात फक्त एकच मार्गान्त स्थानक आहे:
१० आगार : - या विस्तारासाठी कोणताही अतिरिक्त डेपो प्रस्तावित नाही. ओवळे किंवा गायमुख या दोन्हीपैकी सीएसएमटी ते गायमुखचा आगार योग्य प्रमाणात वाढल्यानंतर या विस्तारासाठी वापरला जाईल.
# | स्थानकाचे नाव | आंतर-स्थानक अंतर (मी) | |
---|---|---|---|
1 | गायमुख रेती बंदर | 0 | |
2 | वरसोवा चार फाटा | ४३४२.३४ | |
3 | काशिमीरा | २६८४.६४ | |
4 | शिवाजी चौक (मीरा रोड) | ८७२.९४१ |
मेट्रो मार्गिका १०, मार्गिका ११ आणि मार्गिका ४ या विस्तारासाठी ओवळे किंवा गायमुख येथे कार डेपो वापरला जाईल.
मार्गिका १० ठाण्यातील गायमुखला मीरा रोडच्या शिवाजी चौकात जोडते. या मार्गिकेवर ९.२ किलोमीटर मध्ये चार उन्नत स्थानके असतील.
हिरवी मार्गिका 10 | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
# | स्थानकाचे नाव | स्थिती | अदलाबदल | स्थानकाचा प्रकार | |||||
1 | शिवाजी चौक (मिरा रोड) | मंजूर | Red Line 9 (बांधकाम अंतर्गत) | उन्नत | |||||
2 | काशिमिरा | मंजूर | काहीही नाही | उन्नत | |||||
3 | वर्सोवा चार फाटा | मंजूर | काहीही नाही | उन्नत | |||||
4 | गायमुख रेती बंदर | मंजूर | काहीही नाही | उन्नत | |||||
5 | गायमुख | मंजूर | Green Line 4 (बांधकाम अंतर्गत) | उन्नत |